सांगली महापालिकेकडून 21 फेब्रुवारीला माझी कृष्णामाई स्वच्छता अभियान : जिल्ह्यातील एनजीओ, संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे: उपायुक्त राहुल रोकडे यांचे आवाहन
सांगली: प्रदूषण व अस्वच्छतेच्या विळख्यातुन बाहेर काढून कृष्णा नदीने मोकळा श्वास घ्यावा, गतवैभव प्राप्त करून सांगलीकरांसाठी आकर्षण केंद्र व्हावे यासाठी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमार्फत 21 फेब्रुवारी 2022 रोजी सांगली येथील कृष्णा नदीच्या काठावरील सरकारी घाट, माई घाट(समर्थ घाट) या ठिकाणी "माझी वसुंधरा अभियान" अंतर्गत "कृष्णामाई स्वच्छता अभियान" आयोजित करण्यात आले आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम होत आहे.
दि. २१/०२/२०२२ रोजी सकाळी १०.०० ते ०२.०० वाजेपर्यंत राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेच्या नियोजनाची बैठक महापालिकेत पार पडली. बैठकीस उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, सहायक आयुक्त नितीन शिंदे, सावता खरात, दिलीप घोरपडे, दत्तात्रय गायकवाड, आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, अनिल पाटील उपस्थित होते.
या माझी कृष्णामाई स्वछता अभियानात सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिक, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, सेवाभावी संस्था यांनी सदर माझी कृष्णामाई स्वच्छता अभियानांतर्गत कृष्णा नदी परिसर स्वच्छ करण्यासाठी आपल्याकडील स्वच्छतेकामी वापरण्यात येणाऱ्या साहित्यासह या अभियानात सहभागी होऊन आपली कृष्णामाई स्वच्छ करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन यावेळी उपायुक्त राहुल रोकडे यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.