Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बांधकाम अभियंत्यास 6 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी रंगेहात पकडले

बांधकाम अभियंत्यास 6 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी रंगेहात पकडले 


धाराशिव:   तांत्रिक मान्यता आदेश देण्याकामी सुमारे सहा हजार रूपयांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषद बांधकाम विभागातील एका अभियंत्यास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने साेमवारी सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास रंगेहात पकडले.
ही कारवाई कार्यालयातच करण्यात आली.जिल्हा परिषद बांधकाम विभागात शाखा अभियंता पदावर कार्यरत सय्यद नामक अभियंत्याने अंगणवाडीच्या कामास तांत्रिक मान्यता देण्यासाठी सुमारे साडेसात हजार रूपयांची मागणी केली हाेती. सहा हजारांवर तडजाेड झाली असात, तक्रारदाराकडून ही रक्कम स्वीकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई साेमवारी सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा नाेंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.