शासकीय रुग्णालयातील शवपेटी धूळखात : आंदोलनाचा इशारा


सांगली : येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील शवाग्रहाची इमारतीची दुरवस्था झाली आहे. शव ठेवण्याचे मॉरचरी (वातानुकूलित शवपेटी) ही खराब असल्यामुळे मृत लोकांचे शव मॉरचरीला ठेवायचे असल्यास ते मिरज येथे घेऊन जावे लागत आहेत. पार्किंग ठिकाणी ठेवण्यात आलेले मॉरचरींचा उपयोग करण्यात यावा, अन्यथा आंदोलन उभाण्याचा इशारा नागरिक जागृती मंचच्यावतीने देण्यात आला आहे. मृत झालेले तसेच बेवारस शव ठेवण्याची इमारतीची दुरवस्था झालेली आहे. 

दीड ते दोन महिन्यांपासून सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंग ठिकाणी शव ठेवण्याचे तीन मॉरचरी (वातानुकूलित शेवपेटी) धूळखात पडून आहेत. एका बाजूला मृत नातेवाईकांची गैरसोय होत असताना तीन मॉरचरी (वातानुकूलित शवपेटी) पार्किंगमध्ये धूळखात पडलेले आहे. सोमवारी नागरिक जागृती मंचाच्यावतीने जागेवर जावून याचा पंचनामा करण्यात आला. प्रशासनाने मॉरचरी ठेवण्यासाठी इमारतीची दुरुस्ती करून उपयोगात आणावेत अन्यथा नागरिक जागृती मंचच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. सतीश साखळकर, काका अब्दागिरे, आनंद देसाई आदी उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.