सुधीरदादांच्या प्रचारासाठी गोव्याचे मुख्यमंत्री आज सांगलीत विविध संस्था, संघटना आणि कार्यकर्ते यांच्याबरोबर संवाद
सांगली ,दि.८: भारतीय जनता पक्षाचे नेते आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत उद्या (शनिवारी) सांगली दौऱ्यावर येत आहेत. सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रचारासाठी त्यांचा हा दौरा आहे. डॉ.सावंत सांगली हॉटेल असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य,
सांगलीतील चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी आणि विविध बँकांचे पदाधिकारी, अधिकारी यांच्याबरोबर संवाद साधणार आहेत. बामणोली येथील विवेकानंद हॉस्पिटलला भेट, डॉक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य, बिल्डर्स असोसिएशन क्रीडाई संस्था यांचे पदाधिकारी यांच्याबरोबर करणार आहेत.दक्षिण भारत जैन सभेच्या वखार भागातील मुख्यालयाला ते भेट देणार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.