Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड; 10-11 मंत्र्यांचा राजीनामा

गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड; 10-11 मंत्र्यांचा राजीनामा
 

गुजरातच्या राजकारण मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळत आहे. गुजरातच्या मंत्रिमंडळात येत्या दोन दिवसांत मोठा फेरबदल होणार आहे. मंत्रिमंडळात नवीन चेहरे पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वात आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पावले उचचली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नव्या मंत्रिमंडळात रिवाबा जडेजा, जीते वाघानी आणि अर्जुन मोडवाडिया मंत्री होण्याची शक्यता आहे. हर्ष सांघवी यांना कॅबिनेट मंत्रि‍पदाचा दर्जा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्या मंत्र्यांना पदावरून हटवलं, ते आज मंत्रि‍पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. गुजरातच्या मंत्रिमंडळातील ८ ते १९ मंत्र्यांना पदावरून हटवलं जाऊ शकतं. तर १३ ते १५ नवे चेहरे मंत्रिमंडळात दिसू शकतात.

गुजरातच्या मंत्रिमंडळात फेरबदल नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात आता अर्जुन मोडवाडिया आणि रिवाबा जडेजा यांच्यासहित अनेक लोक मंत्रिमंडळात दिसतील. रिवाबा जडेजा या क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांच्या पत्नी आणि राजकीय नेत्या आहेत. रिवाबा जडेजा या २०२२ साली भाजपच्या तिकीटावर उत्तर जामकर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या मतदारसंघात त्यांनी ५० हजार मतांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता.
 
सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रिमंडळातील फेरबदल हा आगामी २०२७ सालच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात येत आहे. गुजरातच्या मंत्रिमंडळात २७ मंत्र्यांना स्थान देण्यात येईल. सध्या मंत्रिमंडळात १७ मंत्र्‍यांचा समावेश आहे. तर १० खाते रिक्त आहेत. आता मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. तर काही खाते रिक्त ठेवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.