किन्नरांच्या दोन गटात वाद, 1,500,000,000 रुपयांची संपत्ती; इंदूरच्या सामूहिक आत्महत्या करण्याच्या प्रकरणाला वेगळं वळण
दोन्ही गटाच्या वादाला १५० कोटी रुपयांची संपत्ती आणि धार्मिक मतभेद कारणीभूत
पैशाच्या वाटपावरून झालेल्या वादामुळे २४ किन्नरांनी फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
मुस्लिम आणि हिंदू किन्नरांमध्ये धर्मांतरावरूनही तणाव वाढलाय
इंदूरमध्ये किन्नरांच्या दोन गटात वाद सुरु आहे. काल रात्री २४ किन्नरने फिनाइल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणी भाजप नेते गुरुवारी पोलीस आयुक्तांना भेटले. यावेळी खासदार, आमदार आणि नगराध्यक्ष देखील होते. 'आजतक'च्या वृत्तानुसार, नगराध्यक्ष सुमित मिश्रा यांनी सांगितलं की, पोलिसांनी विनंती केली आहे की, असली आणि नकली किन्नरांचा वाद मिटवण्यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी आणि नोंदणी करायला हवी. बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या किन्नरांवर कारवाई करायला हवी'.
अधिवक्ता सचिन सोनकर यांनी सांगितलं की, 'मुस्लिम किन्नर आणि हिंदू किन्नरांवर धर्म परिवर्तनासाठी दबाव असतो. धर्मांतर करण्यास नकार दिल्यास एचआयव्हीचं इंजेक्शन टोचण्याची धमकी दिली जाते'. दुसऱ्या गटाची किन्नर सोनम भास्करने सांगितलं की, 'हा वाद ट्रेनमधील भिक्षेत मिळालेल्या पैशांच्या वाटणीवरून सुरु झाला'. 'पैशांमध्ये वाटणी न मिळाल्याने मारहाणीची धमकी देण्यात आली. आत्महत्या करण्याचा प्रयत्न फक्त लक्ष वेधण्यासाठी केलं आहे. याचा तपास करायला हवा, असंही एका किन्नरने सांगितलं. पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही गटाच्या किन्नरमध्ये वेगळाच वाद आहे. दोन्ही गटातील वादाचं कारण हे १५० कोटी रुपयांची संपत्ती आहे. नंदललपुरामध्ये दोन्ही गटाच्या किन्नरांकडे महागडे घरे, गाड्या आणि दागिने आहेत. हा वाद धार्मिक आणि आर्थिक या दोन्ही प्रकारचा आहे.
किन्नरची गोळ्या झाडून हत्या
राजस्थानच्या कोटपूतली-बहरोड जिल्ह्यात महिनाभरापूर्वी एका किन्नर गुरुची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. शस्त्रधारकांनी केलेल्या गोळीबारात गुरु मधु शर्मा यांचा जागीच मृत्यू झाला होता. गोळीबारात जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी या किन्नरला दाखल करण्याआधी मृत घोषित केलं. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पथक तैनात करत तपासाला सुरुवात केली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.