Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पगारदार लोकांना सॅलरी अकाउंटवर मिळतात 'हे' 5 आर्थिक लाभ ! प्रत्येक कर्मचाऱ्याला माहिती असायला हवेत असे नियम

पगारदार लोकांना सॅलरी अकाउंटवर मिळतात 'हे' 5 आर्थिक लाभ ! प्रत्येक कर्मचाऱ्याला माहिती असायला हवेत असे नियम
 

पगारदार लोकांसाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. पगारदार लोकांचे बँकेत सॅलरी अकाउंट असते. या अकाउंट मध्ये त्यांच्या महिन्याचा पगार जमा होत असतो. पण अनेकांना सॅलरी अकाउंट वर मिळणाऱ्या फायद्यांबाबत फारशी माहिती नसते. सॅलरी अकाउंट फक्त महिन्याचा पगार मिळवण्यासाठीच असते असे अनेकांना वाटत असेल. पण प्रत्यक्षात सेवेक अकाउंट पेक्षा सॅलरी अकाउंट वाल्यांना अधिक लाभ मिळतात.

 
सॅलरी अकाउंट धारकांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात ज्या सेविंग आणि करंट अकाउंट धारकांना मिळत नाहीत. दरम्यान आज आपण सॅलरी अकाउंट असणाऱ्या लोकांना नेमक्या कोणकोणत्या सुविधा मिळतात याची माहिती या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही कुठे नोकरी करत असाल आणि तुमच्याही सॅलरी अकाउंट असेल तर आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचायलाच हवी. पगार खात्यावर तुम्हाला नेमक्या कोणकोणत्या सुविधा मिळतात आणि कोणते आर्थिक लाभ मिळतात? याची डिटेल माहिती तुम्हांला असणे आवश्यक आहे.

ह्या सुविधा मिळतात
ज्या लोकांचे सॅलरी अकाउंट असते त्यांना त्यांच्या बँकेच्या एटीएम मधून अनलिमिटेड मोफत व्यवहार करता येतात. व्यवहारासाठी कोणतेच अतिरिक्त शुल्क द्यावे लागत नाही.

पगार खात्यावर ग्राहकांना ओवरड्राफ्ट ची सुविधा मिळते. म्हणजे जर खात्यात पैसे नसतील तरीसुद्धा पैसे काढता येतात. ओवरड्राफ्ट हा कर्जाचाच एक प्रकार आहे. पण यासाठी कोणत्याच कागदपत्रांची पूर्तता करावी लागत नाही.

सॅलरी अकाउंट धारकांना विनामूल्य एटीएम कार्ड आणि चेक बुक दिले जाते. इतर खातेधारकांना या सुविधेसाठी काही शुल्क द्यावे लागते. विशेष म्हणजे सॅलरी अकाउंट असणाऱ्यांना प्रीमियम प्लॅटिनम डेबिट कार्ड सुद्धा मिळते.

सेविंग अकाउंट मध्ये ठेवलेल्या पैशांवर जेवढे व्याज मिळते त्यापेक्षा सॅलरी अकाउंटमधील पैशांवर अधिक व्याज दिले जात आहे. सॅलरी अकाउंट वरील व्याजदर अधिक असल्याने पगारदार लोकांना मोठा दिलासा मिळतो.

सेविंग अकाउंट तसेच करंट अकाउंट असणाऱ्या लोकांना मिनिमम बॅलन्स मेंटेन करावे लागते. पण सॅलरी अकाउंट असणाऱ्या लोकांना खात्यात रक्कम ठेवण्याची काही आवश्यकता नाही. त्यांच्या अकाउंट मध्ये मिनिमम पैसे नसतील तरीही त्यांना चार्जेस द्यावे लागत नाहीत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.