Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बच्चू कडू प्रचंड आक्रमक, कडूंची सरकारला धडकी भरवणारी घोषणा; उद्यापासून थेट.

बच्चू कडू प्रचंड आक्रमक, कडूंची सरकारला धडकी भरवणारी घोषणा; उद्यापासून थेट.

माजी मंत्री बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. नागपूर-हैदराबाद महामार्गावर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अशातच आज सायंकाळी 6 वाजण्यापूर्वी बच्चू कडू यांनी आंदोलकांसह आंदोलनस्थळ सोडावे असा आदेश कोर्टाने दिला आहे.

त्यानंतर आता बच्चू कडू अटक करून घेण्यासाठी पोलीसांकडे निघाले आहेत. तसेच त्यांनी पोलीसांना एक पत्रही लिहीले आहे. यात त्यांनी सरकारला धडकी भरवणारी घोषणा केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बच्चू कडू यांचा सरकारला गंभीर इशारा

बच्चू कडू यांनी पोलीसांना एक पत्र लिहीले आहे. यात त्यांनी पोलीसांनी आम्हाला अटक करावी, एका तासात अटक करावी. अटक नाही केली तर कोर्टात सागंणार की आम्हाला अटक केली नाही म्हणून आम्ही परत जागेवर आलो. प्रश्न सुटला नाहीतर उद्या रेल रोको करणार अशी घोषणा कडू यांनी केली आहे. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. कारण नागपूर हे भारतातील रेल्वेचे मध्यवर्ती ठिकाण आहे. य़ा शहरात देशभरातून गाड्या येत असतात, त्यामुळे रेल्वेसेवा कोलमडण्याची शक्यता आहे.

सरकारचे शिष्टमंडळ बच्चू कडू यांची भेट घेणार

बच्चू कडू यांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार आहेत. यात मंत्री पंकज भोयर आणि मंत्री आशिष जैसवाल यांचा समावेश आहे. या चर्चेतून काय तोडगा निघतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हे शिष्टमंडळ दुपारी 4 वाजता येणार होते, मात्र काही कारणास्तव ते पोहाचू शकले नव्हते, आता थोड्याच वेळात हे शिष्टमंडळ कडू यांची भेट घेणार आहे.

तुम्ही तुमची ताकद दाखवा, आम्ही आमची ताकद दाखवतो

बच्चू कडू यांनी कोर्टाच्या आदेशानंतर म्हटले होते की, ‘काही लोक आंदोलन सपंल म्हणून जात आहेत, त्यांना सांगतो की आंदोलन आत्ता सरू होईल. निवडणूक जिंकण्यासाठी मशीनचा वापर करायचा, आंदोलन मोडण्यासाठी न्यायालयाचा वापर करायाचा, एखाद्याला पक्षात घेण्यासाठी ED लावायची. आता न्यायालयवर लोक आंदोलन करायला लागतील, तुम्ही तुमची ताकद दाखवा, आम्ही पण आमची ताकद दाखवू.’

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.