जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अनेकांनी आपले राजकीय पत्ते खोलले नव्हते. मात्र, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे यासह प्रभागाचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर अनेक इच्छुक तयारीला लागले आहेत. अशातच सांगली जिल्ह्यातील खासदार विशाल
पाटीलयांची पत्नी पूजा पाटील यांनी जिल्ह्यातील एका मतदारसंघात अचानक दौरे
वाढवले आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिलांसाठी खुला वर्ग राखीव
झाल्यानंतर मिरजच्या पूर्वभागात संपर्क दौरा सुरू केला आहे. सांगली जिल्हा
परिषदेचे अध्यक्षपद महिला खुल्या प्रवर्गासाठी राखीव पडल्याने जिल्ह्यातील
अनेक नेत्यांच्या पत्नीची नावे अध्यक्ष पदासाठी दावेदार म्हणून पुढ़े येऊ
लागली आहेत. अशातच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी दावेदार म्हणून पूजा
पाटील यांच्या नावाची भर पडली आहेत.
नुकतेच जिल्हा परिषदेतील मतदार संघाचे
आरक्षण निश्चित झाले आहे. त्यामुळे मिरज तालुक्यातील पूर्व भागात असणारे
आरग, भोसे या मतदारसंघात खुला प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित झाले आहे.
कोणत्याही एका मतदारसंघातून पूजा पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब
केला जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने खासदार विशाल
पाटील यांच्या प्रचारार्थ पत्नी पूजा पाटील यांनी यातील अनेक मतदारसंघात
जाऊन नागरिकांशी संपर्क साधला होता. त्याचा फायदा आता जिल्हा परिषदेच्या
निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. त्याचा कार्यकर्त्यांना अंदाज आल्याने
आतापासूनच पूजा पाटील यांना जिल्हा परिषदेच्या रणांगणात उतरवण्याची तयारी
खासदार पाटील गटाने ठेवले आहे.
आता पर्यंत मिरज पूर्व भागातील आरग, भौसेसह नाद्र जिल्हा परिषद मतदारसंघात मीसक्षम' अतर्गत खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करून महिलासह नागरिकाशी संपर्क वाढवला आहे. तसेच त्यांनी मिरज पूर्व भागासह तालुक्यातील गणपती मेंडळ व नवरात्र मंडळाना भेटी देऊन कोणता मतदारसंघ सेफ आहे. याची चाचपणी केली आहे. मिरज पूर्व भाग हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.