Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र हादरला! 'तु माझा मुलगा आहेस ना? आपल्यात सगळ चालत' आई मुलासोबत करत होती अश्लील कृत्य अन् नंतर..

महाराष्ट्र हादरला! 'तु माझा मुलगा आहेस ना? आपल्यात सगळ चालत' आई मुलासोबत करत होती अश्लील कृत्य अन् नंतर..
 

नाशिक: नाशिक शहरातील गायकवाड मळा परिसरात एक अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका 34 वर्षीय सावत्र आईवर तिच्या सावत्र मुलासोबत अश्लील कृत्य करण्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना समोर आली जेव्हा पीडित मुलाच्या सख्ख्या आईला ही धक्कादायक माहिती मिळाली आणि तिने त्वरित पोलिसांकडे फिर्याद दिली.

पीडित मुलाच्या सख्ख्या आईच्या तक्रारीनुसार, तिचा १३ वर्षीय मुलगा आणि ८ वर्षीय मुलगी पतीकडे राहतात. पती नसताना सावत्र आईने मुलांना वेळोवेळी मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. सावत्र आईने मुलासोबत अश्लील बोलणे, नकळत त्याचे व्हिडीओ शुट करणे आणि घरात एकटा असताना त्याच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा गंभीर आरोप आहे. मुलाने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. तेव्हा आईला धक्का बसला. या त्रासासोबतच, जेवण न देणे, उन्हात उभे करणे यासह इतर अमानुष प्रकार ती करत होती. मुलाच्या म्हणण्यावरून सख्ख्या आईने तातडीने चाइल्ड हेल्पलाइनवर संपर्क साधला आणि ऑनलाईन तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली आणि POCSO कायद्याअंतर्गत सावत्र आईविरुद्ध गुन्हा दाखल केला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.