Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपच्या पडळकरांचा इशारा ठरला 'फुसका बार'; राजारामबापू पाटील साखर कारखान्याचं धुराडं पेटलं

भाजपच्या पडळकरांचा इशारा ठरला 'फुसका बार'; राजारामबापू पाटील साखर कारखान्याचं धुराडं पेटलं
 

भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना टार्गेट करून टीका करताना दिसत आहेत. नुकतंच त्यांनी जतमधील साखर कारखान्यावरून जयंत पाटील यांना डिवचलं होतं. नुकतंच त्यांनी जतमधील साखर कारखान्यावरून जयंत पाटील यांना आव्हान दिलं होतं. पण गोपीचंद पडळकरांचा  हा इशारा फुसका बार ठरल्याचं स्पष्ट झालं आहे.

'तुम्हाला जतची इतकी चिंता आणि काळजी आहे तर मग जतच साखर कारखाना सभासदांना देऊन टाका. नाही तर मी जत तालुक्यातील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना युनीट क्रमांक चारचे धुराडे पेटू देणार नाही,मोठा संघर्ष करायची माझी तयारी आहे,असा इशारा पडळकर यांनी दिला होता.पण पडळकरांचा हा इशारा फुसका बार ठरल्याचेच स्पष्ट झालं आहे.

माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील जत येथील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे गाळप हंगाम शनिवारी (ता.25) सुरू झाले आहे. शेतकरी व सभासदांच्या हस्ते यावर्षीच्या गाळप हंगामाचा शुभारंभ पार पडला. यावेळी या गाळप हंगामाच्या शुभारंभाला पडळकर विरुद्ध पाटील या संघर्षाची किनार होती.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी कारखान्यावर गंभीर आरोप करत यंदा कारखान्याचे धुराडे पेटू देणार नसल्याचा इशारा दिला होता. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राजारामबापू साखर कारखान्याकडे जतचा साखर कारखाना असून हा सभासदांचा कारखाना असून तो पुन्हा सभासदांच्या मालकीचा झाला पाहिजे,अशी भूमिका पडळकरांनी घेतली आहे. 
 
धक्कादायक बाब म्हणजे शुक्रवारी मध्यरात्री कारखान्याचं राजारामबापू पाटील हे नाव बदलून रातोरात राजे विजयसिंह डफळे असे नामांतरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.त्यामुळे जिल्ह्यामध्ये एकच गोंधळही उडाला होता. असं नाव कोणी लिहिलं? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याचदरम्यान,आता आमदार गोपीचंद पडळकरांच्या आव्हानानंतरही साखर कारखान्याच्या गाळप हंगामाला सुरुवात करण्यात आली आहे. यानिमित्तानं पडळकर यांचा इशारा फोल ठरल्याची चर्चा सांगलीच्या राजकारणात जोरदारपणे सुरू आहे. तसेच पाटील आणि साखर कारखान्याबाबत येत्या काळात पडळकर नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
जत येथील राजारामबापू पाटील सहकारी हा साखर कारखाना सभासदांना परत केल्याशिवाय तो सुरू होऊ देणार नसल्याचा इशाराही पडळकरांनी दिला होता. त्यामुळे आता कारखान्याच्या फलकावरील नाव कोणी बदललं हे अद्याप समोर आलं नसलं तरी या नाव बदलल्याच्या मुद्द्यावर पडळकर आणि पाटील या दोन्ही नेत्यांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.