Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रोखठोक गडकरींचा 'इनकमिंग'वरुन भाजप नेत्यांना इशारा; म्हणाले, 'प्रामाणिक कार्यकर्त्यांवर...'

रोखठोक गडकरींचा 'इनकमिंग'वरुन भाजप नेत्यांना इशारा; म्हणाले, 'प्रामाणिक कार्यकर्त्यांवर...'
 

महापालिका आणि झेडपीच्या निवडणुका कुठल्याही परिस्थिती जिंकण्याच संकल्प भाजपने केले आहे. याकरिता भाजपमध्ये अधिकाधिक लोकांना सहभागी करून घेतल्या जात आहे. पक्षात जोरदार इनकिमिंग सुरू आहे. मात्र केंद्रीयमंत्री नितीन गडकरी  यांना हे रुचल्याचे दिसत नाही. त्यांनी शुक्रवारी आपल्या भावना जाहीरपणे बोलून दाखवल्या. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या निष्ठावंतांना जपा, त्यांच्यावर अन्याय करू नका असे त्यांनी भाजपच्या नेत्यांना बजावले.

निष्ठावान कार्यकर्त्यांना घर की मुर्गी दाल बराबर समजून बाहेरचा चिकन सावजी मसाला आपल्याला कितीही चांगला वाटत असता तरी यामुळे जेवढ्या झपाट्याने तुम्ही वर चालला तेवढ्याच झपाट्याने खाली आपटाल असा धोक्याचा इशाराही मंत्री गडकरी यांनी यावेळी दिला. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम भाजपच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार आशिष जयस्वाल, माजी आमदार सुधाकर कोहळे, भाजपचे नेते डॉ. राजू पोतदार आदी यावेळी उपस्थित होते.

विधानसभेच्या निवडणुकीत सावनेर विधानसभा मतदारसंघात डॉ. राजू पोतदार प्रमुख दावेदार होते. त्यांनी यापूर्वीची निवडणूक लढली होती. सुनील केदार यांनी त्यांचा पराभव केला. असे असताना त्यांना डावलण्यात आले. भाजपने  आशिष देशमुख यांना काँग्रेसमधून आयात करून त्यांना उमेदवारी दिली. ते विजयीसुद्धा झाले. तब्बल वर्षभरानंतर गडकरी यांनी राजू पोतदार यांचा आपल्या भाषणात उल्लेख केला. ते चांगले व प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. डॉक्टर आहे. भाजपसाठी त्यांनी आपला दवाखाना सोडला. ते आजही सक्रिय आहेत. 
 
असा उत्तम कार्यकर्ता आपल्याला लाभला आहे. त्यांना जोपासण्याची गरज आहे. त्यांची कदर करा, जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा असा सल्ला त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना दिला. आपण घर की मुर्गी दाल बराबर समजतो. बाहेरचा चिकन सावजी मसाला कितीही चांगला लागत असला तरी, त्याने नुकसानच होते. डॉ. पोतदार यांच्यावर अन्याय करू नका. नगर परिषदेच्या निवडणुका आटोपल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हा अन्याय दूर करतील असा विश्वास व्यक्त करून गडकरी यांनी बरेच इश्यू पेंडिग असल्याचे सांगताच एकच हशा पिकला.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.