नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेमध्ये भारताने पाकिस्तानला धूळ चारत विजय मिळवला. मात्र, ही मालिका सुरू होण्यापूर्वी आणि मालिका झाल्यानंतर देखील यावरून चांगलंच राजकारण तापला असल्याचा पाहायला मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून देखील भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये भूमिका घेतली होती. तशीच काहीशी भूमिका एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी देखील घेतल्याचं पाहायला मिळाला आहे. तसेच आशिया कप स्पर्धेमध्ये मिळालेले
मानधन भारतीय क्रिकेट संघाने पहलगाम हल्ल्यातील कुटुंबीयांना आणि भारतीय
सैन्याला देण्याचं ठरवलं आहे. त्यावरून असदुद्दीन ओवैसी यांनी जोरदार टीका
केली असल्याचं पाहायला मिळालं.
पुण्यामध्ये आयोजित वार्तालाप कार्यक्रमांमध्ये बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले, भारत पाकिस्तान बॉर्डरवर दहा लाख सैनिक असताना पहलगाम हल्ल्यातील आतंकवादी देशात कसे आले याबाबत केंद्र सरकारला कोणीही प्रश्न विचारात नाही. त्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं त्याबाबत भारतीय सैन्याचे नेहमीच कौतुक आहे. मात्र, त्यानंतर भारत पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळतो हे कितपत योग्य आहे.
ही क्रिकेट मॅच खेळली नसती तर पाकिस्तानला पैसे मिळाले नसते. आपण सिंधू जल करार रद्द करून त्यांचा 80% पाणी रोखला आहे. त्यांच्याशी व्यापार बंद केला आहे. वाघा बॉर्डर देखील बंद करून टाकली आहे. तसेच त्यांचे नागरिकचे भारतामध्ये उपचारासाठी येत होते त्यांना देखील प्रतिबंध करण्यात आला आहे. एवढे सगळे प्रतिबंध असताना क्रिकेट मॅच खेळण्याची काय गरज होती असा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केला आहे. आशिया कपची फायनल जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर थ्री झिरो अशा पद्धतीचं ट्विट केलं होतं. क्रिकेट मॅच च्या विजयची तुलना ऑपरेशन सिंदूरशी करणे हा एक प्रकारे या सिंदूर मध्ये सहभागी झालेल्या सैन्याचा अवमान असल्याचं ओवेसी यांनी सांगितलं.
आशिया
कप जिंकल्यानंतर जे मानधन भारतीय संघाला मिळाला आहे. ते मानधन इंडियन
आर्मी आणि पहलगाम हल्ल्यांमध्ये पीडित कुटुंबाला देण्याचा निर्णय घेण्यात
आला आहे. त्यावर प्रश्न विचारला असता ओवैसी म्हणाले, जर आज झोळी घेऊन पुणे
शहरामध्ये इंडियन आर्मीसाठी पैसे द्या म्हणून फिरलो, तर जेवढं भारतीय
संघानं दिलं आहे, त्याच्या दुपटीनं जनतेनं दिल्या असतं हे माझं चॅलेंज
आहे,असं ओवैसी म्हणाले. तसेच हा फक्त पैशांचा विषय नसून देशातील जनतेच्या
अभिमानाचा विषय असल्याचेही त्यांनी म्हटलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.