रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात रविवारी दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान बोलताना सरन्यायाधीशांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याही नावाचा उल्लेख केला.
मंडणगडमधील न्यायालयासारखी इमारत देशातील कुठल्याही तालुक्यामध्ये नसेल, असे कौतुक सरन्यायाधीश गवई यांनी केले. या इमारतीमधून समाजाच्या शेवटच्या नागरिकाला कमीत कमी वेळेत, कमीत कमी खर्चात न्याय मिळेल, या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्नशील रहाल; जेणेकरुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक आणि आर्थिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल, अशी अपेक्षा सरन्यायाधीश गवई यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र सरकारचं संपूर्ण सहकार्य मिळाले नसते तर असे इन्फ्रास्ट्रक्चर झाले नसते. काही अँगलमध्ये काही लोकं अशी टीका करत असतात की, महाराष्ट्र हा इफ्रास्ट्रक्चरच्या बाबत खूप मागसलेले आहे. मी त्याला उत्तर देऊ इच्छित नाही, पण त्यांनी एकदा नाशिक, नागपूरमधील न्यायालय किंवा कोल्हापूरमध्ये जुन्या इमारतीचा झालेला कायापालट, विविध तालुक्यांमधील इमारती पाहाव्यात. मंडणगडमधील इमारतीसारखी इमारत देशातील कुठल्याही तालुक्यात असणार नाही, असे सरन्यायाधीश गवई यांनी म्हणाले.देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 2019 दरम्यान मुख्यमंत्री असताना न्यायालयाच्या इमारतींसाठी खूप चांगले सहकार्य केले. त्यानंतरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही सहकार्य लाभले आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजींची टीम होतीच. मी खरोखर महाराष्ट्र शासनाचे याप्रसंगी आभार मानू इच्छितो, की त्यांनी न्यायालयांच्या इमारतींसाठी खूप चांगले सहकार्य केले. कार्यपालिका आणि न्यायपालिकेने एकत्रितपणे पायाभूत सुविधांसाठी काम केले असेल तर त्यात काही गैर नाही. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असेही सरन्यायाधीश गवई म्हणाले.न्याय हा पक्षकाराच्या दारात पोहचला पाहिजे. म्हणून आपण ठिकठिकाणी न्यायालये उभी करतो. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या रत्नागिरी जिल्ह्यात महत्वाचा खटला चालवला. त्या जिल्ह्यातील आंबवडे या आंबेडकरांचे मुळ गाव असलेल्या तालुक्यातही न्यायालय उभे राहिले, याचा आनंद असल्याचे सरन्यायाधीश म्हणाले. या इमारतीतून नागरिकांना कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी खर्चात न्याय मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पीडब्ल्यूडीचे काम म्हणजे...
सार्वजनिक
बांधकाम विभागाबाबत अशी समजूत होती की, या विभागाचे काम असेल तर ते खराबचं
असलं पाहिजे आणि वर्ष-दोन वर्षात ती इमारत खराब होऊन जाईल. पण अलीकडच्या
काळात पीडब्ल्यूडीने केलेली कामे अतिशय सुंदर केली आहेत, असे सरन्यायाधीश
म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.