Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दिल्लीत लेटरबॉम्ब, महाराष्ट्रात हादरे! या पत्राने राज्याचं राजकारण पूर्णपणे बदलणार; राज ठाकरेंमुळे..

दिल्लीत लेटरबॉम्ब, महाराष्ट्रात हादरे! या पत्राने राज्याचं राजकारण पूर्णपणे बदलणार; राज ठाकरेंमुळे..
 

महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये मतभेद दिसून येत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे चुलत बंधू तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या युतीवर केवळ शिक्कामोर्तब होणं शिल्लक असतानाच या युतीमुळे महाविकास आघाडीत मीठाचा खडा पडेल असं चित्र दिसत आहे. यामागील कारण म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट दिल्लीमध्ये महाराष्ट्र काँग्रेसच्या नेतृत्वासंदर्भात लेटरबॉम्ब टाकल्याचं सांगितलं जात आहे.

 
काय आहे या लेटरबॉम्बमध्ये?
संजय राऊत यांनी दिल्लीमधील काँग्रेसच्या पक्ष श्रेष्ठींना पत्र पाठवलं आहे. या पत्रामध्ये राऊत यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची तक्रार केली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांचा मनसेला महाविकास आघाडीत घेण्यास विरोध आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात राऊत यांनी लिहिलेलं हे पत्र वाचून काँग्रेसमधील दिल्लीतील पक्षश्रेष्ठी शिवसेनेवर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेसचे दिल्लीतील नेते ठामपणे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पाठीशी आहेत.

...म्हणून काँग्रेसला राज ठाकरे नकोसे

हर्षवर्धन सपकाळ यांनी राऊत यांना पत्र लिहून राज ठाकरे यांच्याबाबत चर्चा करून कळवतो असं सांगूनही राऊत यांनी दिल्लीत पत्र लिहिल्यानं पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. राज ठाकरे यांच्या संदर्भात कुठलीही चर्चा अद्यापर्यंत झालेली नसताना राज ठाकरेंसोबत जाण्याचा प्रश्नच नसल्याची कॉंग्रेस श्रेष्ठींनी स्पष्ट केलं आहे. राज ठाकरेंसोबत गेल्यानं परप्रांतीय मतदार लांब जाईल असं काँग्रेस श्रेष्ठीचं मत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हर्षवर्धन सपकाळ मनसेसंदर्भात नेमकं काय म्हणाले?
"मनसेच्या महाविकास आघाडीतील समावेशाबाबत कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही आणि चर्चाही झालेली नाही. त्यामुळे मनसेला महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्याबाबत नाराजी आहे किंवा टोलवाटोलवी सुरू आहे, या फक्त माध्यमांतील चर्चा आहेत." हे विधान सपकाळ यांनी 14 ऑक्टोबर 2025 रोजी करण्यात आले असून काँग्रेस हायकमांडशी त्यांची भेट घेतल्यानंतर हे विधान समोर आलं आहे. यामुळे मनसे-काँग्रेस आघाडीची शक्यता कमी झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे."मनसेच्या महाविकास आघाडीतील समावेशाबाबत कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही आणि चर्चाही झालेली नाही. त्यामुळे मनसेला महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्याबाबत नाराजी आहे किंवा टोलवाटोलवी सुरू आहे, या फक्त माध्यमांतील चर्चा आहेत." हे विधान सपकाळ यांनी 14 ऑक्टोबर 2025 रोजी करण्यात आले असून काँग्रेस हायकमांडशी त्यांची भेट घेतल्यानंतर हे विधान समोर आलं आहे. यामुळे मनसे-काँग्रेस आघाडीची शक्यता कमी झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
वाढत गेलं तर...

हा वाद वाढत गेला तर माहविकास आघाडीतून ठाकरेंची शिवसेनाबाहेर पडले. सध्याच्या घडामोडी पाहता शरद पवारांची राष्ट्रवादीही ठाकरे बंधूंसोबत निवडणूक लढेल अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हे पत्र महाराष्ट्रातील राजकारणाची दशा आणि दिशा बदलवणारं ठरु शकतं.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.