PSI वर अत्याचारातून गर्भवती राहिल्याचे आरोप, त्याच्याच गाडीत नवऱ्याने दोघांनाही रंगेहात पकडलं अन्. भररस्त्यावर राडा
बीड: बीडमध्ये भररस्त्यावर पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. येथे एका विवाहित महिलेने ज्याच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले. त्याच्यासोबतच फिरायला गेलेल्याची घटना घडली. विवाहितेच्या नवऱ्याने दोघांनाही रंगेहाथ पकडून भररस्त्यावर मारहाण केली आहे. पोलीस अधिकाऱ्याला भर रस्त्यात मारहाण केल्याने बीडमध्ये पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव रवींद्र शिंदे असं आहे. नुकतेच या विवाहित महिलेने शिंदे यांच्यावर अत्याचाराचे आरोप केले होते. तसेच शिंदे यांनी केलेल्या अत्याचारातून ती गर्भवती राहिल्याचा आरोपही तिने केला होता. विशेष म्हणजे याप्रकरणी संबंधित महिलेने शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर रवींद्र शिंदे फरार होते. दरम्यान, विवाहितेने ज्यांच्यावर आरोप केला होता, त्या शिंदेसोबत शहरात फिरताना आढळून आली. याची माहिती महिलेच्या पतीला मिळाली. त्यानंतर त्यांनी दोघांनाही गाडीतून बाहेर काढत रंगेहाथ पकडून भररस्तावर चांगलाच चोप दिला.
नेमकं प्रकरण काय?
आरोपी रवींद्र शिंदे आणि पिडीत महिला शेजारी राहत होते. तेंव्हा त्यांच्यात ओळख झाली. यातून त्यांच्यात प्रेम संबंध जुळले. त्यानंतर शिंदे यांची धाराशिवला बदली झाली. मात्र त्यानंतरही शिंदे पीडितेच्या घरात घुसून पिस्तूलचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केला असा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर पिडीत ही गर्भवती राहिल्याची माहिती समोर आली. या आरोपानंतर शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेंव्हापासून शिंदे फरार होते.दरम्यान, शुक्रवारी दुपारच्यासुमारास शिंदे बीडमध्ये येऊन पत्नी सोबत फिरत असल्याची माहिती पतीला मिळाली. त्यानंतर पती त्यांच्यावर पाळत ठेऊन होता. पीडिता आणि शिंदे (एमएच 23 बीसी 3402) या कारमधून भाग्यनगर परिसरात फिरत असताना ते तिच्या पतीने पाहिले. त्यानंतर पतीने त्यांचा पाठलाग करत बसस्थानकासमोर त्यांना अडवले. रागात येऊन पतीने शिंदेला कारमधून खाली घेतले. त्यानंतर कपडे फाटेपर्यंत मारहाण केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.