Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुणे :- शाळेत हाय व्होल्टेज ड्रामा..! टिळा लावून येण्यास विरोध ? नेमकं काय घडलं?

पुणे :- शाळेत हाय व्होल्टेज ड्रामा..! टिळा लावून येण्यास विरोध ? नेमकं काय घडलं?


भोर (पुणे): भोर तालुक्यातील न्हावी गावातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कपाळावरील टिळ्यावरून वाद निर्माण झाला. विद्यार्थ्यांना कपाळावर टिळा लावून शाळेत येण्यास विरोध केल्याचा आरोप मुख्याध्यापक एस.एन. कांबळे यांच्यावर करण्यात आला. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, काही विद्यार्थ्यांनी कपाळावर टिळा लावून शाळेत आल्यानंतर मुख्याध्यापकांनी त्यास विरोध केल्याचा आरोप करण्यात आला. ही बाब समजताच काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शाळेत धाव घेत मुख्याध्यापकांना जाब विचारला. कार्यकर्त्यांनी प्रश्नांची सरबत्ती करत मुख्याध्यापकांना धारेवर धरले. यावेळी शाळेच्या परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांना टिळा लावून शाळेत येण्याची मुभा द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.

दरम्यान, वाढता वाद लक्षात घेऊन मुख्याध्यापकांनी स्पष्टीकरण देत शाळेत टिळा लावण्यास कोणतेही बंधन नसल्याचे स्पष्ट केले. तसेच विद्यार्थ्यांना टिळा लावून शाळेत येण्यास परवानगी असल्याचे सांगितले. भविष्यात पुन्हा असा प्रकार घडल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दिला आहे. या घटनेमुळे भोर तालुक्यातील शैक्षणिक वर्तुळात चर्चा रंगली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.