Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आम्ही मदत करु शकत नाही, तुमचं तुम्ही बघा! अमेरिकेनं ऐन युद्धात नागरिकांना वाऱ्यावर सोडलं

आम्ही मदत करु शकत नाही, तुमचं तुम्ही बघा! अमेरिकेनं ऐन युद्धात नागरिकांना वाऱ्यावर सोडलं


वॉशिंग्टन: मध्य पूर्वत युद्धामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. इस्रायल, अमेरिकेनं संयुक्त कारवाई करत इराणवर हवाई हल्ले केले. त्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इराणनं बॅलेस्टिक क्षेपणास्त्रं आणि ड्रोन्सचा मारा सुरु केला. आखाती देशांमधील अमेरिकेच्या हवाई आणि नौदल तळांवरही इराणनं हल्ले केले. सध्याच्या घडीला अमेरिकेचे नागरिक मध्य पूर्वेत मोठ्या संख्येनं अडकले आहेत. पण त्यांच्या मायदेशानं त्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.

इस्रायलवर इराणनं सातत्यानं हल्ले सुरु ठेवले आहेत. इस्रायलच्या मुख्य शहरांवर क्षेपणास्त्रांचा मारा सुरु आहे. इस्रायलमध्ये अडकलेल्या अमेरिकन नागरिकांची संख्या मोठी आहे. या नागरिकांना मायदेशाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण त्या फोल ठरल्या आहेत. सरकार तुमच्या सुटकेची व्यवस्था करु शकत नाही. या परिस्थितीतून तुम्हालाच मार्ग काढावा लागेल, अशी भूमिका अमेरिकन सरकारनं घेतल्यानं इस्रायलमध्ये अडकलेल्या अमेरिकन नागरिकांची गोची झाली आहे. 


सद्यस्थिती लक्षात घेऊन इस्रायलमधील अमेरिकेचे राजदूत माईक हकाबी यांनी तिथे अडकलेल्या अमेरिकन नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सध्याच्या घडीला इस्रायलमधून बाहेर पडण्यासाठी उपलब्ध असलेले पर्याय अतिशय कमी आहेत, असं माईक हकाबी यांनी सांगितलं आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हकाबी यांनी एक पोस्ट केली आहे. 'सध्याच्या घडीला इस्रायली पर्यटन मंत्रालयाकडून चालवल्या जाणाऱ्या शटल बसेस या प्रवासासाठी उत्तम पर्याय आहेत. त्या बसमधून इजिप्तच्या ताबा सीमेपर्यंत जाऊ शकता. ताबा पोहोचल्यावर प्रवासी तिथून विमान पकडू शकतात किंवा पु़ढे जाऊन काहिराला जाऊन अमेरिकेसह अन्य देशांसाठी जाणारी विमानं पकडू शकतात,' असं हकाबी यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आम्ही सध्याच्या घडीला अमेरिकन नागरिकांच्या सुटकेसाठी काहीही करु शकत नाही. लोकांनी त्यांच्या सुरक्षेची काळजी स्वत: घ्यावी आणि इस्रायलमधून बाहेर पडण्याची योजना स्वत:च आखावी, असं अमेरिकन दूतावासाकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. जॉर्डनच्या मार्गानं इस्रायल सोडू नका, असा सल्ला हकाबी यांनी दिला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.