Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिल्पा शेट्टीचा पती प्रसिद्ध अभिनेत्रीला घेऊन कसा बनवायचा अश्लील चित्रपट?

शिल्पा शेट्टीचा पती प्रसिद्ध अभिनेत्रीला घेऊन कसा बनवायचा अश्लील चित्रपट?



मुंबई :
 
मुंबई पोलिसांनी सोमवारी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक केली आहे. राज कुंद्राला अटक झाल्यामुळे सध्या बॉलिवूड आणि उद्योग जगतामध्ये एकच खळबळ उडालेली पाहायला मिळत आहे. अश्लील व्हिडीओ शूट करण्याच्या रॅकेटमध्ये गहना वशिष्ठलाही अटक करण्यात आली होती. त्यामुळे आता चौकशीमध्ये अनेक धागेदोरे समोर येत आहे. याचीच झळ राज कुंद्रालाही बसलेली दिसत आहे.

फेब्रुवारीमध्ये 'गंदी बात'मधील अभिनेत्री गहना वशिष्ठला वेब सीरिजच्या नावाखाली अश्लील व्हिडीओ शूट करून वेबसाईटवर अपलोड केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. गहनासोबत आणखी अकरा जणांना याप्रकरणी अटक करण्यात आलं होतं. यामध्ये राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत याचाही समावेश होता.

अश्लील चित्रपट बनवण्याचं काम कसं चालायचं?-


तपासामध्ये आंतराष्ट्रीय स्तरावर गहना वशिष्ठ आणि उमेश कामत याला केनरिन प्रॉडक्शन हाऊसमधून अश्लील चित्रपट बनवण्याचे काम मिळत असल्याचं समोर आलं. केनरिन प्राॅडक्शन हाऊस अनेक एजंट्सना अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याचे कंत्राट आणि आर्थिक मदत देत असल्याचा आरोप आहे. अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन मेलच्या माध्यमातून केनरिन प्रॉडक्शन हाऊसला पाठवल्या जायच्या. एकदा का या चित्रपटांचं काम पूर्ण झालं तर यासाठी त्यांना बँक अकाऊंटद्वारे पैसे पाठवले जायचे.


दरम्यान, केनरिन प्रॉडक्शन हाऊस देशभरातील वेगवेगळ्या एजंट्सच्या मार्फत अश्लील चित्रपट पुरवण्याचा व्यवसाय करत आहे आणि त्यासाठी फंडिंग करत असल्याचं गुन्हे शाखेच्या चौकशीत समोर आलं. अश्लील व्हिडीओ, चित्रपट बनवून सोशल मीडियासारख्या हाॅटस्पाॅटवर अपलोड करण्यात यायचे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.