सांगली महापालिकेत माजीमंत्री स्व. मदनभाऊ पाटील यांची पुण्यतिथी
सांगली: महाराष्ट्राचे माजी महिला बालकल्याण मंत्री स्व. मदनभाऊ पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगली महापालिकेत अभिवादन करण्यात आले.
यानिमित्त सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका मुख्यालय येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात
महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि उपमहापौर उमेश पाटील यांनी स्व. मदनभाऊ पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. यावेळी विरोधी पक्षनेते संजय मेंढे, काँग्रेस नगरसेवक उत्तम साखळकर, संतोष पाटील, फिरोज पठाण, प्रशासकीय अधिकारी अशोक माणकापुरे, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, अमर पडळकर, संजय कांबळे, रवींद्र वळवडे, रेकॉर्ड विभागाचे दत्तात्रय कुलकर्णी, शैलेश कांबळे आदी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.