Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आज चांदीच्या दरात मोठी घसरण, सोनंही झालं स्वस्त; इथे तपासा 10 ग्रॅमचा आजचा भाव

 आज चांदीच्या दरात मोठी घसरण, सोनंही झालं स्वस्त; इथे तपासा 10 ग्रॅमचा आजचा भाव


नवी दिल्ली, 15 डिसेंबर : सोनं-चांदी दरात आज बुधवारी पुन्हा एकदा घसरण झाली आहे. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) फेब्रुवारी वायदा सोने दर 0.46 टक्क्यांनी घसरला आहे. या घसरणीनंतर आज सोनं  48080.00 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. तर चांदीच्या दरातही  आज मोठी घसरण झाली आहे.

आज चांदी 1.20 टक्क्यांनी घसरुन 60,000 रुपयांवर आहे. काल मंगळवारीही सोने-चांदी दरात घसरण झाली होती. सोनं 48,277.00 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदी 61,428.00 रुपयांवर ट्रेड करत होती. सोनं रेकॉर्ड दरावरुन जवळपास 8500 रुपये स्वस्त मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात सोने दर आपल्या ऑल टाइम हाय रेटवर पोहोचला होता.

ऑगस्ट 2020 मध्ये सराफा बाजारात सोन्याचा भाव 55,400 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. आज सोनं रेकॉर्ड स्तरावरुन जवळपास 8500 रुपयांनी स्वस्त झालं आहे. अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप'  च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता.

या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर तुम्हाला जर सोन्या-चांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.