सरकार देतंय आधार कार्ड वर केवळ 2 टक्के व्याजाने कर्ज?
नवी दिल्ली, 11 डिसेंबर : सोशल मीडियावरुन अनेक प्रकारची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असते. परंतु याचा वापर करताना सावधगिरी बाळगणं महत्त्वाचं आहे. सोशल मीडियावरील सगळ्याच माहितीवर डोळे झाकून विश्वास ठेवणं महागातही पडू शकतं.
सध्या एक असा मेसेज व्हायरल होत आहे, ज्यात सरकारकडून कमी व्याज दरात लोन देण्याबाबत सांगण्यात आलं आहे. सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत असून, ज्यात सरकारकडून आधार कार्डवर स्वस्तात कर्ज मिळत असल्याचं सांगितलं जात आहे. PM योजनेंतर्गत सरकार 2 टक्के व्याजाने लोन देत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याशिवाय यात 50 टक्के डिस्काउंटचीही बाब सांगण्यात आली आहे.
परंतु PIB ने सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या मेसेजची पडताळणी केली आणि हा मेसेज पूर्णपणे खोटा, फेक असल्याचं सांगितलं आहे. सरकार अशाप्रकारची कोणतीही योजना राबवत नाही, PIB ने आपल्या फॅक्ट चेकमध्ये पीएम योजनेंतर्गत आधार कार्डवर लोन दिलं जाण्याचा दावा खोटा असल्याचं सांगितलं आहे.
सोशल मीडियावरील हा व्हायरल मेसेज फेक असल्याचं सांगत PIB ने लोकांना सतर्क राहण्याचं सांगितलं आहे. त्याशिवाय असा मेसेज कुठेही फॉरवर्ड न करण्याचंही म्हटलं आहे. मेसेजच्या जाळ्यात अडकून तुमची खासगी माहिती कोणाशीही शेअर न करण्याचंही PIB ने म्हटलं आहे.
काय आहे PIB?
PIB Fact Check सरकारच्या पॉलिसी/स्कीम्स/विभाग/मंत्रालयं यासंदर्भातील चुकीच्या सूचनांचा लोकांमध्ये प्रसार होऊ नये याकरता काम करते. सरकारसंबंधित कोणतीही बातमी खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी तुम्ही PIB Fact Check ची मदत घेऊ शकता. कोणतीही व्यक्ती PIB Fact Check ला संशयास्पद बातमीचा किंवा पोस्टचा स्क्रीनशॉट, ट्वीट, किंवा फेसबुक पोस्ट 918799711259 या WhatsApp क्रमांकावर पाठवू शकता. त्याचप्रमाणे pibfactcheck@gmail.com या मेल आयडीवर मेल करून देखील तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.