Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बीड : दोन तरुणींनी तरुणाच्या घरी जाऊन केला विनयभंग; अंबाजोगाईत 3 जणांविरुद्ध गुन्हा

 बीड : दोन तरुणींनी तरुणाच्या घरी जाऊन केला विनयभंग; अंबाजोगाईत 3 जणांविरुद्ध गुन्हा


तुम्ही एखाद्या मुलीने तरुणाचा विनयभंग केल्याचं कधी ऐकलंय का? पण, अशी प्रत्यक्षात घडली आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात ही घटना घडली आहे. दोन मुलींनी तरुणाच्या घरी जाऊन त्याचा विनयभंग केला. इतकंच नाही, तर त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी पोलिसांनी दोन तरुणींसह त्यांच्यासोबत असलेल्या एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. सध्या या घटनेची शहरात चर्चा होऊ लागली आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात दोन तरुणींनी एका मुलाच्या मदतीने 30 वर्षीय तरुणाचा विनयभंग केल्याची घटना घडली. अंबाजोगाई शहरातील एका वसाहतीत राहत असलेल्या 30 वर्षीय तरुणासोबत हा प्रकार घडला आहे.एका मुलाला घेऊन दोन तरुणी 30 वर्षीय तरुणाच्या घरी गेल्या. वाईट हेतूने त्याचा हात धरला आणि त्याला मिठी मारून विनयभंग केला. त्यानंतर तरुणींनी त्या तरुणाला शिवीगाळ करत जीवे मरण्याची धमकीही दिली.

ही घटना 11 डिसेंबर रोजी सकाळी अंबाजोगाई शहरातील एका वसाहतीत घडली आहे. दरम्यान, याप्रकरणी पीडित तरुणाच्या फिर्यादीवरून बबलू बाळू घाडगे, आशा बाळू घाडगे आणि वैशाली श्याम काळम (सर्व राहणार लाल नगर, अंबाजोगाई) यांच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस करत आहेत. दुसरीकडे तरुणाच्या विनयभंगाच्या या घटनेनंतर अंबाजोगाईत याची लोकांमध्ये चर्चा होताना दिसत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.