पुष्पा' सिनेमाने मोडले सर्व रेकॉर्ड, बॉक्स ऑफिसवर केली कोट्यवधींची कमाई
कोरोनाचे निर्बंध सध्या काही राज्यामध्ये शिथिल करण्यात आले आहे. यामुळे पुन्हा एकदा आर्थिक परिस्थिती देखील आटोक्यात येत आहे. संपूर्ण देशभरात आता सिनेमागृह देखील खुली करण्याची परवानगी सरकारने दिली असून सध्या महाराष्ट्रात देखील 50 टक्के आसन क्षमतेसह थिएटरमध्ये एंट्री करण्याची मुभा देण्यात आलीये.
यामुळे पुन्हा एकदा सिनेमाला अच्छे दिन आले आहेत असं म्हणायला हरकत नाही. अनेक बिग बजेट सिनेमा रिलिज झाले असून मराठी सिनेमांसह, हॉलिवूड, बॉलिवूड आणि टॉलिवूडचे सिनेमा देखील थिएटर गाजवत आहेत. नुकंतच साऊथ सुपरस्टार अल्लु अर्जुनचा 'पुष्पा : द राइज' हा बहुप्रतिक्षीत सिनेमा रिलीज झाला आहे. सिनेमाने पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई केली आहे.
अभिनेता अल्लु अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा 'पुष्पा' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 'पुष्पा' 17 डिसेंबरला सिनेमा रिलीज झाला असून पहिल्याच दिवशी सिनेमाने जगभरात 50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आणि पुष्पाच्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाल. रिपोर्टनुसार सिनेमाने तमिळनाडुमध्ये पहिल्या दिवशी 4.06 कोटी रुपयांची कमाई केली. रणवीर सिंहच्या '80' या सिनेमामुळे 'पुष्पा'सिनेमाच्या मेकर्सने चित्रपट लवकर रिलीज करण्याचा निर्णय घेतला. तेलंगणामध्ये सिनेमाने 11 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे.रश्मिका - अल्लु अर्जुनची जबरदस्त जोडी
पुष्पा द राईज हा सिनेमा सुकुमार यांनी दिग्दर्शित केला आहे. सध्या या सिनेमाचा पहिला पार्ट रिलीज करण्यात आला आहे तर दुसरा भाग 2022 रिलजी करण्यात येईल अशा चर्चा सुरू आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.