विराट-रोहितपेक्षा आक्रमक फलंदाज, अवघ्या वर्षातच विश्व विक्रमाला गवसणी
मुंबई : क्रिकेट विश्वात रोहित शर्मा आणि विराट कोहलीपेक्षा आक्रमक आणि तडाखेदार फलंदाज आला आहे, जो दिवसेंदिवस वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करत चाललाय. पाकिस्तानचा फलंदाजच मोहम्मद रिजवानने टी 20 क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे जो आतापर्यंत रोहित आणि विराटलाही जमलेला नाही. रिजवानने सुरु 2021 वर्षात आतापर्यंत टी 20 क्रिकेटमध्ये 2 हजार 36 धावा केल्या आहेत.क्रिकेट विश्वात याआधी हा कारनामा कोणत्याच फलंदाजाला करता आला नाही. रिजवान एका वर्षात टी 20 क्रिकेटमध्ये 2 हजारपेक्षा अधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
पाकिस्तानचा विकेटकीपर फलंदाज मोहम्मद रिजवानने या वर्षात आतापर्यंत 48 टी सामन्यात 56.55 च्या सरासरीने 2 हजार 36 धावा चोपल्या आहेत. यामध्ये 1 शतकासह 18 अर्धशतकांचा समावेश आहे.
पाकिस्तान विरुद्ध वेस्टइंडिज यांच्यात 16 डिसेंबरला तिसरा टी 20 सामना खेळवण्यात आला. या सामन्यात त्याने 51 वी धाव घेताच हा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. पाकिस्तानने या सामन्यात विडिंजवर 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह पाकिस्तानने 3-0 ने विडिंजला क्लीन स्वीप दिला. पाकिस्तानच्या विजयात रिजवानने निर्णायक भूमिका बजावली. रिजवानने 87 धावांची खेळी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.