Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सुकेश चंद्रशेखरमुळे आता बॉलिवूड ईडीच्या रडारवर; शिल्पा शेट्टी, श्रद्धा कपूरचे नाव समोर

 सुकेश चंद्रशेखरमुळे आता बॉलिवूड ईडीच्या रडारवर; शिल्पा शेट्टी, श्रद्धा कपूरचे नाव समोर


नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांमध्ये विविध तपास यंत्रणांनी बॉलिवूडचे काही अभिनेते आणि अभिनेत्रींची चौकशी केली होती.

त्यात प्रामुख्याने अमली पदार्थांशी संबंध होता. मात्र, आता बॉलिवूड अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आले आहे. आता सुमारे २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री शिल्पा शेट्टी, श्रद्धा कपूर आणि नोरा फतेही यांची नावे समाोर आली आहेत. सुकेशकडून त्यांनी अतिशय महागडे गिफ्ट घेतले असून अशा १५ अभिनेत्रींवर ईडीची नजर आहे. याशिवाय श्रद्धा कपूरचेही नाव सुकेशने घेतले आहे. अभिनेता सुशांत राजपूत याच्या आत्महत्याप्रकरणात एनसीबीने अमली पदार्थांच्या चौकशीसाठी तिला बोलाविले हाेते. तिला याप्रकरणातून बाहेर पडण्यासाठी मदत केली हाेती, असे सुकेशने तपास अधिकाऱ्यांना सांगितले.

सुकेशने नोरा फतेहीला एक आलिशान बीएमडब्ल्यू कार, आयफोन आणि एक कोटी रुपये दिल्याचे ईडीला आढळले आहे. दोघांचे चॅटही समोर आले होते. ती खूप आवडत असल्याने तिला महागडे गिफ्ट दिल्याचे सुकेशने तिला सांगितले होते. नोरा फतेहीला ईडीने समन्स पाठवून चौकशीसाठी बोलाविले होते.

जॅकलीनची विचारपूस


-काही दिवसांपूर्वी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हीची ईडीने कसून चौकशी केली होती.

- सुकेश चंद्रशेखरने तिला अतिशय महागडे गिफ्ट दिले होते. आता त्याने शिल्पा शेट्टी, श्रद्धा कपूर, नोरा फतेही या अभिनेत्रींसह हरमन बावेज या अभिनेत्याचेही नाव घेतले आहे.

- चौकशीदरम्यान सुकेशने शिल्पा शेट्टीचा उल्लेख केला. तिचा पती राज कुंद्रा पाॅर्नाेग्राफी प्रकरणात अडकल्यानंतर सुकेशने तिला संपर्क केला हाेता.

- शिल्पा ही त्याची मैत्रिण असून जामिनासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली होती.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.