महापालिकेच्या सांगली प्रसूतिगृहात अत्याधुनिक सोनोग्राफी मशिनचे लोकार्पण: महापौर, आयुक्त यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
सांगली: महिला बालकल्याण समितीच्या प्रयत्नातून घेण्यात आलेल्या सांगली प्रसूतिगृहातील अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनचे लोकार्पण गुरुवारी महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या सोनोग्राफी मशीनमुळे सांगली शहरातील गरोदर महिलाची मोठी गैरसोय दूर झाली आहे. तसेच सांगलीत दर बुधवारी दुपारी 2:30 नंतर सोनोग्राफी केली जाणार आहे.
महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीकडून अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन खरेदी करण्यात आले आहेत. मिरज प्रसूतीगृह आणि सांगली प्रसूतिगृह याठिकाणी या सोनोग्राफी मशीन बसविण्यात आले आहेत. सांगलीतील प्रसूतिगृहात बसवण्यात आलेल्या या सोनोग्राफी मशीनचे लोकार्पण आज झाले. यावेळी महापौर दिग्विजय सुर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस, स्थायी सभापती निरंजन आवटी, गटनेते विनायक सिंहासने, महिला बालकल्याण समिती सभापती गीतांजली ढोपे पाटील, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, समाजकल्याण सभापती सुबराव मद्रासी, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, नगरसेविका अनारकली कुरणे, शुभांगी साळुंखे, आरती वळवडे, उर्मिला बेलवलकर, नगरसेवक मंगेश चव्हाण वैद्यकीय आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे, वैद्यकीय अधिकारी डॉ सुचेता पवार, डॉ. सचिन पाटील, डॉ. शुभांगी वायदंडे, मुख्य औषध निर्माण अधिकारी, दत्तात्रय अष्टेकर, औषध भांडार प्रमुख महेंद्र गोंजारी, आरसीएचचे सुरेंद्र शिंदे, किशोर कोठावळे यांच्यासह वैद्यकीय स्टाफ उपस्थित होता.
सांगलीत बुधवारी तर मिरजेत शुक्रवारी सोनोग्राफीची व्यवस्था: आयुक्त नितीन कापडणीस
आजपासून सांगली आणि मिरज प्रसूतिगृहात गरोदर महिलांसाठी मोफत सोनोग्राफीची सोय सुरू झाली आहे. सांगली प्रसूतिगृहात दर बुधवारी दुपारी 2:30 ते 5 यावेळेत तर मिरजेला प्रत्येक शुक्रवारी दुपारी 2:30 ते 5 यावेळेत सोनोग्राफीची वेळ असणार आहे. तसेच भविष्यात पूर्णवेळ सोनोग्राफी तपासणी सुरू करण्याचा प्रशासनाचा मानस असल्याचे मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.