मनपाक्षेत्रातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महापौर आपल्या दारी अभियान: महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांची घोषणा : 7 फेब्रुवारीपासून अभियान सुरू करणार: नागरिकांच्या दारात जाऊन घेणार समस्या जाणून


सांगली : सांगली महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेचे महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी महापौर आपल्या दारी अभियान हाती घेतले आहे. या अभियानाची महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी घोषणा केली. 7 फेब्रुवारीपासून प्रभागात जाऊन महापौर दिग्विजय सुर्यवंशी हे समस्या जाणून घेणार आहेत. सांगली महापालिकेचा 9 फेब्रुवारी रोजी वर्धापनदिन आहे. या दिनाचे औचित्य साधत महापालिकेचे महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी नागरिकांच्या समस्या

जाणून घेण्यासाठी महापौर आपल्या दारी अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 7 फेब्रुवारीपासून पुढील अडीच महिने महापौर दिग्विजय सुर्यवंशी हे महापालिकेच्या 20 प्रभागात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. 7 फेब्रुवारी रोजी प्रभाग क्रमांक 1 मधून महापौर आपल्या दारी हे अभियान सुरु होणार आहे. 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता आंबा चौक कुपवाड येथून या उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार असून उपक्रमासाठी महापालिकेचे सर्व पदाधिकारी , स्थानिक नगरसेवक , मनपाआयुक्त नितीन कापडणीस आणि त्यांचे सर्व विभागाचे अधिकारी हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्याचठिकानी नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारीबाबत त्याच ठिकाणी निपटारा करण्याचा आमचा मानस असल्याचे महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.