Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महापालिकेडून अनधिकृत 15 नळ कनेक्शन बंद : सांगली कुपवाडच्या 60600 कनेक्शनचा सर्व्हे सुरू: पाणीपुरवठा विभागाचे 31 कर्मचाऱ्यांकडून होतोय सर्व्हे

महापालिकेडून अनधिकृत 15 नळ कनेक्शन बंद : सांगली कुपवाडच्या 60600 कनेक्शनचा सर्व्हे सुरू: पाणीपुरवठा विभागाचे 31 कर्मचाऱ्यांकडून होतोय सर्व्हे


सांगली : सांगली शहरातील अनधिकृत 15 नळ कनेक्शन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने बंद केली आहेत. याचबरोबर अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्यासाठी सांगली आणि कुपवाडच्या 60600 कनेक्शनचा सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. पाणीपुरवठा विभागाच्या 31 कर्मचाऱ्यांकडून सर्व्हे केला जात आहे. अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्यासाठी ही मोहीम हाती घेणेचे आदेश मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिले आहेत. 

    सांगलीच्या जुना बुधगाव रोड, शिंदे मळा, कलानगर परिसरात 15 नळ कनेक्शन ही अनधिकृत आढळून आल्यानंतर आयुक्त नितीन कापडणीस यांनी याची गंभीर दखल घेत सर्व 15 कनेक्शन तातडीने बंद करण्याचे आदेश दिले होते. यानुसार पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी अधिकारी आप्पा अलकुडे, विशेष अभियंता सुनील पाटील यांच्या पथकाने बुधवारी 15 अनधिकृत नळ कनेक्शन बंद केली आहेत. यासाठी पाणी पुरवठा विभागाचे पाईप इन्स्पेक्टर, मीटर रीडर आणि अन्य कर्मचारी यांनी दिवसभर 15 कनेक्शन बंद करण्याची कामगिरी पूर्ण केली आहे. 


दरम्यान, सांगली आणि मिरजेतील अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्यासाठी आयुक्त कापडणीस यांनी आपल्या दालनात बैठक घेऊन सूचना केल्या. यावेळी उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके , पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी अधिकारी आप्पा अलकुडे, विशेष अभियंता सुनील पाटील उपस्थित होते.  यावेळी तातडीने नळ कनेक्शनचा सर्व्हे सुरू करण्याचे आदेश आयुक्त कापडणीस यांनी दिले. या आदेशानंतर बुधवारपासूनच पाणीपुरवठा विभागाकडून सांगली आणि कुपवाड भागातील अनधिकृत पाणी कनेक्शन शोधण्यासाठी सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. पाणीपुरवठा अधीक्षक उज्वला शिंदे यांच्या सूचनेनुसार 31 कर्मचारी सांगली आणि कुपवाडमधील 60600 नळ कनेक्शनचा सर्व्हे करत आहेत. यामध्ये कनेक्शन अधिकृत आहे का, पाणी बिल नियमित येते का, मीटर सुरू आहे का याबाबतची संपूर्ण माहिती संकलित केली जाणार आहे. या सर्व्हेमध्ये अनधिकृत आढळून येणाऱ्या कनेक्शन धारकावर कारवाई केली जाणार आहे तसेच ते नळ कनेक्शन तातडीने बंद केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकानी आपल्या नळ कनेक्शनबाबतची माहिती मनपा कर्मचाऱ्यांना देऊन सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा अधीक्षक उज्वला शिंदे यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.