Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी पात्र खेळाडूंनी 15 फेब्रुवारी पर्यंज अर्ज करावेत - जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे

क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी पात्र खेळाडूंनी 15 फेब्रुवारी पर्यंज अर्ज करावेत - जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे


सांगली दि. 10 : महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याकरिता राज्यात प्रतिभावंत खेळाडूंची निवड करून शास्त्रोक्त प्रशिक्षण, शिक्षण, भोजन, निवास, क्रीडासुविधा, क्रीडा प्रबोधिनींच्या अंतर्गत खेळाडूना देण्यात येत आहेत. राज्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ सेवा प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचण्याद्वारे निवासी व अनिवासी खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार आहे. या चाचण्यासाठी पात्र खेळाडूंनी विहित नमुन्यातील अर्जासोबत जन्मतारखेचा दाखला, आधार कार्ड, क्रीडा प्रमाणपत्रे जोडून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली येथे दि. १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत सादर करावेत व सांगली जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी केले आहे.

क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ प्रवेश प्रक्रिया व खेळनिहाय कौशल्यचाचणी अर्हता पुढीलप्रमाणे आहे. सरळ प्रवेश प्रक्रिया - क्रीडा प्रबोधिनीमध्ये समाविष्ट खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेला खेळाडू ज्यांचे वय १९ वर्षाआतील आहे. खेळाडूंना संबधीत खेळाबाबतची चाचणी तज्ञ समिती समक्ष देऊन प्रवेश निश्चित केला जातो. खेळनिहाय कौशल्यचाचणी - क्रीडा प्रबोधिनीमध्ये समाविष्ट खेळात राज्यस्तरावर सहभागी व ज्याचे वय १९ वर्षाचे आत आहे अशा खेळाडूंनी खेळनिहाय कौशल्यचाचणी आयोजन करून गुणानुक्रमे प्रवेश दिला जाईल. अनिवासी प्रवेश प्रक्रिया - अनिवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशाकरिता अधिकृत राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम, द्वित्तीय, तृतीय स्थान प्राप्त स्थान करणाऱ्यांना प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. समाविष्ट खेळप्रकार - आर्चरी, ज्युदो, हॅन्डबॉल, अथलेटीक्स, बॉक्सींग, बॅडमिंटन, शुटींग, कुस्ती, हॉकी, टेबल टेनीस, वेटलिफ्टींग, जिम्नॅस्टीक्स.

अधिक माहितीसाठी: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली येथे संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. वाघमारे यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.