Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पायाभूत सोयी-सुविधा राबविण्यासाठी 18 फेब्रुवारी पर्यंत प्रस्ताव सादर करा - जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव

पायाभूत सोयी-सुविधा राबविण्यासाठी 18 फेब्रुवारी पर्यंत प्रस्ताव सादर करा - जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव


सांगली दि. 10 : अल्पसंख्यांक विकास विभागाकडील शासन परिपत्रक दि. 8 फेब्रुवारी 2022 अन्वये जिल्हास्तरावर सन 2021-2022 मध्ये धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा राबविण्यासाठी दि. 18 फेब्रुवारी 2022 अखेर सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव यांनी केले आहे.

धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा राबविण्यासाठी जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित / विना अनुदानित / कायम विना अनुदानित शाळा, अपंग शाळा, नगरपालिका/नगरपरिषद शाळा व औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्याकडून दि. 7 ऑक्टोबर 2015 च्या अल्पसंख्यांक विकास विभाग शासन निर्णयातील निकषांची पूर्तता करून प्रस्ताव सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा नियोजन समिती, नियोजन शाखा, जिल्हाधिकारी  कार्यालय, विजयनगर सांगली  येथे 0233-2600525 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही श्रीमती यादव यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.