Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महापालिका वर्धापनदिनी आरोग्य विभागात रांगोळीतून माझी वसुंधराची जनजागृती

 महापालिका वर्धापनदिनी आरोग्य विभागात रांगोळीतून माझी वसुंधराची जनजागृती


सांगली : महापालिकेच्या 24 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत शासनाच्या माझी वसुंधरा आणि स्वच्छ सर्व्हेक्षण 2022 ची जनजागृती करण्यात आली. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाकडून जनजागृतीपर अधिक भर देण्यात आला आहे.

    महापालिकेचा वर्धापनदिन प्रबोधनात्मक साजरा करण्यावर मनपा कर्मचाऱ्यानी भर दिला आहे. वर्धापनदिनी आरोग्य विभाग मुख्यालयातील महिला कर्मचाऱ्यानी रांगोळीतून माझी वसुंधरा आणि स्वच्छ सर्व्हेक्षण 2022 ची जनजागृती करत नागरिकांना अभियानाचा संदेश दिला. उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके,  वै. आरोग्यधिकारी डॉ सुनील आंबोळे, डॉ रवींद्र ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या लिपिक प्रेरणा चव्हाण आणि स्नेहल चव्हाण यांनी ही जनजागृती रांगोळी काढत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या आकर्षक रांगोळीतून शासनाच्या माझी वसुंधरा आणि स्वच्छ सर्व्हेक्षण 2022 ची जनजागृती करणारे संदेश देण्यात आले आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.