सांगली महापालिकेकडून पाळीव श्वानांचा सर्व्हे सुरू : स्वच्छता कर्मचारी करणार सर्व्हे
सांगली: सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून पाळीव श्वानांचा सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी घरोघरी जाऊन पाळीव श्वानांचा सर्व्हे करणार आहेत. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार पाळीव श्वानांचा सर्व्हे सुरू करण्यात आला आहे.
महापालिका क्षेत्रात भटक्या श्वानांची समस्या मोठी आहे. या भटक्या श्वानामध्ये अनेक पाळीव श्वान सुद्धा रस्त्यावर असतात. त्यामुळे भटक्या श्वानांची संख्या मोठी दिसत आहे. त्यामुळे मनपाक्षेत्रातील पाळीव आणि भटक्या श्वानांची संख्या निश्चित करण्यासाठी महापालिका आरोग्य विभागाकडून घरगुती पाळीव श्वानांची माहिती घेण्यासाठी सर्व्हे सुरु करण्यात आला आहे. यामध्ये ज्या घरामध्ये पाळीव श्वान आहे त्याची संपूर्ण माहिती घेतली जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन 10 दिवसात पाळीव श्वानांची माहिती संकलित करणार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.