Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हिजाब प्रकरणी खा.सुप्रियाताई सुळेंचा भाजपवर घणाघात; 'ही मोरल पॉलिसींग...'

 हिजाब प्रकरणी खा.सुप्रियाताई सुळेंचा भाजपवर घणाघात;  'ही मोरल पॉलिसींग...'


कर्नाटकमधील हिजाबच्या वादावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपला लक्ष्य करताना भाजपची नैतिक फौजदारी आणि वैचारिक फौजदारी सुरू असल्याचा प्रहार आज लोकसभेत केला. तसेच उद्योजक घराण्यांचे ५० वर्षातील योगदानाचा अनादर करू नका, असा खोचक सल्लाही ताईंनी सरकारला दिला.

खा.सुप्रियाताई सुळे यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेच्या दरम्यान कर्नाटकमधील हिजाब प्रकरणावरून झालेल्या गदारोळाचा मुद्दा उपस्थित केला. कोणते कपडे हेच ठरविणार. काय खायचे, कुठे कधी जायचे हेच ठरविणार, काय बोलायचे काय नाही बोलायचे, काय शेअर करायचे काय फॉरवर्ड करायचे हेच ठरविणार. याला हुकूमशाही म्हणायचे तर आणीबाणीचा राग आमच्यावर काढणार. यांच्यावर टीका केली तर देशद्रोहाचा खटला टाकणार. लोकशाहीसाठी आंदोलन केले तर आम्हाला आंदोलनजीवी म्हणून हेटाळणार. लोकहो आता तुम्ही काय करणार? श्वास कोंडला असून संकट आपल्या दारात येऊन उभे आहे, अशा मराठी ओळी सादर करून सुप्रियाताई सुळे यांनी या घटनाक्रमावरील अस्वस्थता  व्यक्त केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.