जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उद्योजकांची जिल्हा पुरस्कारासाठी निवड
सांगली दि. 16 : जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सन 2021 या वर्षासाठी जिल्ह्यातील उद्योजकांची जिल्हा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रथम पुरस्कार वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथील योगिता अनिल माळी यांच्या मे व्यास एटंरप्रायजेस तर व्दितीय पुरस्कार पलूस तालुक्यातील कुंडल येथील सचिन बाबासाहेब लाड यांच्या मे. राजतिलक इंडस्ट्रीज यांना मिळाला आहे. अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.