Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गोपीचंद पडळकरांचा उद्धव ठाकरे सरकारवर एसटी कर्मचारी संपावरुन गंभीर आरोप

गोपीचंद पडळकरांचा उद्धव ठाकरे सरकारवर एसटी कर्मचारी संपावरुन गंभीर आरोप


मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या तीन महिन्यांहून जास्त कालावधीपासून संप सुरू असल्यामुळे सामान्य प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. राज्य सरकारने मध्यस्थी करून एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ आणि वेतन निश्चिती यासंदर्भात घोषणा करून संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काही प्रमाणात पूर्ण करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला. पण, कर्मचाऱ्यांचे त्यावर समाधान झालेले नाही. कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असताना आता राज्य सरकारवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी गंभीर आरोप केला आहे.

राज्य सरकारला संप चिघळवण्यात जास्त रस असल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. एसटी संप मिटवण्यापेक्षा, तो चिघळला पाहिजे, त्यात वाढ झाली पाहिजे, असा सुनियोजित कट सरकार रचत आहे. एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू व्हा, असे आवाहन करायचे आणि तो कर्मचारी जेव्हा कामावर रुजू होतो, तेव्हा त्याच्या हातात चार्जशीट द्यायचे. ५० लाखांचे, एक कोटीचे नुकसान झाल्याचे सांगून त्यांना नोटीस द्यायची, असे सरकार करत असल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले.

सध्या एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या बाबत समितीने सरकारकडे अहवाल दिला. आता सरकार पुन्हा आठवड्याभराची मुदत मागत आहे. म्हणजे सरकारला हा संप कसा चिघळतो आणि आपल्याला कशी नवी भरती काढता येईल म्हणजे त्यात आपल्याला टक्केवारी घेता येईल आणि मोठा घोटाळा करता येईल, एसटीच्या भरतीत मोठा घोटाळा करता येईल हा प्लॅन सरकारचा दिसत असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

नुकतेच १०० दिवस एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पूर्ण झाले असून राज्य सरकारमध्ये एसटी महामंडळाचे विलिनीकरण करण्यात यावे, या मागणीपासून मागे हटण्यास एसटी कर्मचारी तयार नाही.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.