Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोव्हिडं अनुदानासाठी महापालिकेडून आत्तापर्यंत 147 प्रस्ताव पात्र

कोव्हिडं अनुदानासाठी महापालिकेडून आत्तापर्यंत 147 प्रस्ताव पात्र : 29 प्रस्ताव अपात्र तर 72 जणांना कागदपत्रे पूर्ततेसाठी दिली वेळ : आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली समितीची 10 वी सुनावणी बैठक संपन्न


सांगली: कोव्हिडंने मयत पावलेल्याच्या वारसांना शासनाकडून मिळणाऱ्या मदतीबाबत सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या कोव्हिडं अनुदान समितीकडून आजअखेर 147 प्रस्ताव पात्र झाले आहेत तर 29 प्रस्ताव हे समितीने कागद पत्राअभावी अपात्र ठरवले आहेत. तसेच 72 प्रस्ताव हे अपुरी कागदपत्रे असल्याने त्यांना कागदपत्र पूर्तता करून पुंनतपासणीसाठी बोलावण्यात आले आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीच्या समितीचे कामकाज गतीने सुरू असून बुधवारी 10 वी बैठक महापालिका मुख्यालयात संपन्न झाली.


सांगलीसाठी नेमण्यात आलेल्या समितीमध्ये उपायुक्त राहुल रोकडे, डॉ. विजय ऎनापुरे आणि सांगली सिव्हिल हॉस्पिटल च्या प्रतिनिधींचा समावेश आहे. आतापर्यंत 10 सुनावणी बैठक सांगलीच्या समितीच्या झाल्या आहेत. या 10 बैठकीला एकूण 344 अर्जदारांना बोलावण्यात आले होते. यापैकी 252 अर्जदार हे प्रत्यक्ष उपस्थित होते. उपस्थित अर्जदाराच्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर 252 पैकी 147 अर्जदारांचे प्रस्ताव मान्य करण्यात आले तर काहीच कागदपत्रे नसलेले 29 प्रस्ताव हे समितीकडून अपात्र ठरवण्यात आले आहेत. तर अपुरी कागदपत्र असणारे 72 प्रस्तावाच्या अर्जदारांना त्यांच्या कागदपत्र पूर्ततेसाठी वेळ देण्यात आली आहे अशी माहिती समिती सदस्य डॉ विजय ऎनापुरे यांनी दिली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.