जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने....
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामपंचायत व महिलाग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने कवलापूर महोत्सव 2022 पार पडला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे मॅडम होत्या यावेळी संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या ज्योती आदाटे यांचा विविध क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी ज्योती आदाटे म्हणाल्या की या ठिकाणी महोत्सवानिमित्त ग्रामीण भागातील महिलांनी वेगवेगळ्या पध्दतीचे खाद्यपदार्थ आणि विविध वस्तूंचे प्रदर्शन भरविले आहे जे श्टाॅल लावुन या महिला भगिनी स्वावलंबी होण्याचा जो प्रयत्न करीत आहेत ते अतिशय अभिनंदणीय आहे.
महिलांनी असाच प्रयत्न करुन एक यशस्वी उद्योजिका बनण्याचा ध्यास ठेवून कार्यशील रहा जिद्द आणि प्रामाणिकपणा ठेवलात तर यश नक्कीच मिळेल. व्यवसाय किती होतोय कसा होतोय हे महत्त्वाचे नाही तुमचा प्रयत्न तुमची जिद्द महत्त्वाची आहे.आपल्या कुटुंबाकडुन आपल्याला आपल्या हौसमौजेला कितीही पैसे मिळतील त्याला अर्थ नाही परंतु स्वकमाईतुन मिळालेल्या रकमेचे मोलच होऊ शकत नाही.महिलेला खर्या अर्थाने स्वावलंबनातुनच सबलता मिळते तसेच महिलांनी राजकारणापासून अलिप्त राहू नये राजकारणात राहुन समाज कारण करता येते सर्व क्षेत्रात अग्रेसर राहावे आपल्यासाठी सर्वच क्षेत्र खुले आहे आपणच आपले पाऊल टाकणे गरजेचे आहे.
महिलांनाआपल अस्तित्व स्वतः निर्माण करावे लागते कोणाची पत्नी मुलगी आई बहिण या ओळखीपेक्षा स्वतः ची ओळख निर्माण केली पाहिजे तरच या महिला दिन साजरे करण्याला अर्थ आहे 1 च आपला दिवस म्हणून चालणार नाही 365 दिवस आपलेच आहेत ही भावना मनाशी बाळगा आणि आपलं अस्तित्व निर्माण करा यावेळी महापौर दिग्विजय सुर्यवंशी डिसीजी बॅकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे आणि या महोत्सवाचे आयोजक आणि तंटामुक्ती चे अध्यक्ष भानुदास पाटील या गावच्या सरपंच शुभांगी नलवडे ताई छायाताई पाटील सारिका मुळे उज्वला गुंडे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते कैलास गुंडे तसेच या त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडीच्या सरचिटणीस प्रियांका तुपलोंडे सचिव छाया पांढरे आणि युवती सरचिटणीस प्रणोती हिंगलजे आणि अनेक मान्यवर ग्रामस्थ प्रचंड संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.