महापालिकेकडून रस्त्यावरील मोकाट जनावरे पकडण्यास सुरवात
महापालिकेकडून रस्त्यावरील मोकाट जनावरे पकडण्यास सुरवात : पहिल्याच दिवशी 15 जनावरे ताब्यात तर 8 जणांना नोटिसा : मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने कारवाई
सांगली: महापालिकेकडून रस्त्यावरील मोकाट जनावरे पकडण्यास सुरवात झाली आहे. पहिल्याच दिवशी महापालिकेच्या संयुक्त पथकाने 15 जनावरे ताब्यात घेतली आहेत तर 8 जनावर मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने ही कारवाई होत आहे.
रस्त्यावर मोकाट जणांवरामुळे रस्त्यावर अपघात वाढत होते तसेच मोकाट जनावरे उपद्रवी ठरत होते. त्यामुळं आयुक्त नितीन कापडणीस यांनी अशी रस्त्यावर फिरणारी मोकाट जनावरे पकडण्याचे आदेश दिले होते. यानुसार आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वच्छता निरीक्षक प्राणिल माने, धनंजय कांबळे, पंकज गोंधळे, यांच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.

.jpeg)