उद्यापासून विधिमंडळाचे अधिवेशन ; शिंदे-फडणवीस सरकारची पहिली कसोटी
मुंबई : बुधवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. मंत्रिमंडळ विस्तार, खातेपाटप ते अतिवृष्टीग्रस्तांना मदत जाहीर करण्यासही झालेला विलंब अशा विविध प्रश्नांवर विरोधी पक्ष सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहे. पहिल्याच अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारची कसोटी लागणार आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस, आता विरोधक म्हणून त्यांच्यात एकजूट राहणार का, या प्रश्नाचे उत्तरही या अधिवेशनात मिळणे अपेक्षित आहे.
भाजपच्या पाठबळाने शिवसेनेत उभी फूट पाडून दीड महिन्यांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. त्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक व नव्या सरकारच्या बहुमताचा निर्णय करण्यासाठी ३ व ४ जुलै रोजी विधानसभेचे अधिवेशन पार पडले. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार बराच काळ रखडला. तब्बल ३९ दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आणि खातेवाटपासाठीही पाच दिवसांचा विलंब झाला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
