रोजगार मेळावा मिरज येथे 28 सप्टेंबरला जास्तीत जास्त उमेदवारांना सहभागी होण्याचे आवाहन
सांगली, दि. 19, : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने नोकरी इच्छुहक बेरोजगार उमेदवारांसाठी औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी दि. 28 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्र, सिध्दीविनायक गणपती कॅन्सर हॉस्पीटलच्या समोर, मिरज येथे ऑफलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे.
हा रोजगार मेळावा ऑफलाईन / ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठी घेण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी आपआपल्या युजर आयडी व पासवर्डच्या आधारे https://mahaswayam.gov.in या संकेत स्थळाव्दारे लॉगीन करून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्तपदांसाठी पसंतीक्रम व उत्सुकता ऑनलाईन पध्दतीने नोंदवावी. सांगली जिल्ह्यामधील औद्योगिक व सेवा क्षेत्रामध्ये तसेच विविध क्षेत्रामधील नामवंत उद्योजकांनी त्यांच्याकडील रिक्त पदे https://mahaswayam.gov.in संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहेत. यामध्ये प्रामुख्याने जेसन फौंन्ड्री, रोटाडाईन टुल्स, जगदिश इंजिनिअरिंग वर्क्स प्रा. लि., हिंदुस्थान नॉयलॉन, कामधेनू ॲग्रोव्हेट, सुपरक्राफ्ट फोन्ड्री, जगदिश आर्यन ॲण्ड स्टील प्रा. लि. सिध्दीविनायक ॲटोमोबाईल, महाबळ मेटल प्रा. लि. श्री. दत्त इंडिया प्रा. लि. व एक्सीला पेन्सील्स लिमीटेड इत्यादी नामवंत कंपन्यानी एकूण 335 रिक्तपदे अधिसुचित केली आहेत. दहावी, बारावी, पदवीधर, पदव्यूत्तर पदवी, आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअरिंग पदवी तसेच मेकॅनिकल इंजिनिअर्स / डिप्लोमा मेकॅनिक /आयटीआय फिटर्स / वेल्डर्स / इलेक्ट्रीशियन/ सीएनजी / व्हीएमसी ऑपरेटर, सुपरवायझर, वर्कस, हेल्पर, मिशिनिष्ठ, मेंटेंन्सस, मार्केटिंग एक्झकेटीव्ह, प्रेस मशीन ऑपरेटर, टर्नर, केमिस्ट, अकौंट असीस्टंट, प्लॅन्ट ऑपरेटर मोल्डींग, सुपरवायझर, लॅब असीस्टंट, टेली कॉलींग, स्पेअरपार्ट असीस्टंट, ड्रायव्हर, टेक्नीशियन, मजूर इत्यादी पदे अधिसूचित करण्यात आली आहेत. अधिक माहिती किंवा याबाबत काही अडचण असल्यास 0233-2990383 या दूरध्वनीवर किंवा sanglirojgar@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. करीम यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.