ठार मारण्याची धमकी देऊन 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार
अल्पवयीन मुलींना जीवे मारण्याची धमकी देऊन एका 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तर, पिडीत मुलीच्या 11 वर्षीय चुलत बहिणीशी अश्लील चाळे केले. विमानतळ पोलिसांनी तरुणाला अटक केली. याप्रकरणी संदीप चंदू पासी (वय 20) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत पिडीत मुलीच्या आईने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला गावी गेली होती. त्यावेळी आरोपी पासी महिलेच्या घरात शिरला. त्याने महिलेच्या मुलीला व त्यांच्या दिराच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांना खोलीत नेले. तसेच, एका मुलीवर अत्याचार केले. तर, दुसऱ्या मुलीशी अश्लील चाळे केले. आई गावाहून परत आल्यानंतर घाबरलेल्या मुलींनी तिला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर हा प्रकार समोर आला. पुढील तपास पोलीस करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
