मा. श्री. कुमार म. तिप्पण्णावर यांनी सभेच्या शाश्वत शिष्यवृत्ती फंडासाठी रु. 1 लाख रुपयांचे बृहत्दान
जुने दानवाड येथे सुरू असलेल्या पंचकल्याण पूजा महोत्सवाचे औचित्य साधून जुने दानवाड येथील धर्मानुरागी निवृत्त शाशकीय अभियंता श्री. कुमार मल्लाप्पा तिप्पण्णावर यांनी दक्षिण भारत जैन सभेच्या लक्ष लक्ष शाश्वत शिष्यवृत्ती फंडासाठी आज रु. 1 लाख रुपयांचे बृहत्दान दिले. पूजा, मंदिरे आणि धर्माबरोबरच समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीही समाजाने पुढे येवून दानधर्म केला पाहिजे याचा आदर्श त्यांनी या देणगीतून घालून दिला.
यावेळी सभेचे चेअरमन श्री. रावसाहेब जि. पाटील व मुख्यमहामंत्री डॉ.अजित ज. पाटील यांनी देणगीचा धनादेश स्वीकारला. मुख्यमहामंत्री डॉ.अजित पाटील यांनी सभेच्या शिष्यवृत्ती फंडाची माहिती देवून यासाठी समाजाने सढळ हताने देणगी द्यावी असे आवाहन केले. उभयतांचे हस्ते सभेतर्फे देणगीबद्दल कृतज्ञतापूर्वक श्री. कुमार तिप्पण्णावर यांचा सन्मान करून आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी पंचकमिटीचे सदस्य व मान्यवर उपस्थित होते. देणगी बद्दल मनःपूर्वक आभार !!!
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.