Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गौतमी पाटील लग्नबंधनात अडकणार?

गौतमी पाटील लग्नबंधनात अडकणार?


नृत्यांगणा आणि सोशल मीडिया स्टार गौतमी पाटीलचं नाव अल्वावधीतच महाराष्ट्रभर लोकप्रिय झालं आहे. आपल्या लावणी आणि सौंदर्याने गौतमी चाहत्यांना घायाळ करत असते. गौतमीचा डान्स पाहायला चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. आता नुकतचं एका मुलाखतीत गौतमीने पहिल्यांदाच लग्नाबाबत भाष्य केलं आहे.

एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गौतमी म्हणाली,"माझं शालेय शिक्षण मुलींच्या शाळेत झालं आहे. बाबाचं लवकर निधन झालं त्यानंतर घरी कोणीच पुरुष नव्हता. ना वडील ना भाऊ, ना नातेवाईक. माझा कधीच कोणत्या पुरुषासोबत वैयक्तिक संबंध आलेला नाही. त्यामुळे घरातल्या जबाबदाऱ्यांचा अर्धा वाटा उचलण्यासाठी तरी एक पुरुष आयुष्यात असायला हवा, अशी माझी इच्छा आहे. याच कारणाने मला लग्न करायचं आहे".

गौतमी पाटीलला कसा जोडीदार हवाय? 

गौतमी पुढे म्हणाली,"मला पैसे, बंगला, प्रतिष्ठा या कशाची गरज नाही. पण येईल त्या परिस्थितीत माझी साथ देणारा जोडीदार मला हवा आहे. जेव्हा असा मुलगा मिळेल तेव्हाच मी लग्नाचा विचार करेन. आता मी 25 वर्षांची असून माझं लग्न झालेलं नाही. पण लवकरच लग्नबंधनात अडकण्याची माझी इच्छा आहे".


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.