खाजगी ट्रॅव्हल्समधून प्रवासादरम्यान महिलेच्या दागिन्यांची चोरी
खाजगी ट्रॅव्हल्स मधून प्रवास करत असताना दोन जणांनी पाळत ठेवून एका महिलेच्या बॅगेतून दहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. यानंतर तक्रार येताच वानवडी पोलिसांनी तत्काळ तपास करून दोन आंतरराज्य गुन्हेगारांना अटक केली आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड या ठिकाणाहून या दोघांना ताब्यात घेतले आहे. शिवा राजु शिंदे (वय 30) व के. तेजा के सागर उर्फ गोपी उर्फ सुर्या शिंदे (वय 20, रा. दोघेही रा. गंगाखेड, मुळ. औरंगाबाद) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. याबाबत 29 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला गुढीपाडव्यानिमित्त त्यांच्या माहेरी लातूर येथे गेल्या होत्या. त्यांनी जाताना सणानिमित्ताने सोने नेले होते. त्या परत पुणे येथे खासगी ट्रॅव्हल्स बसने येत होत्या. रात्री त्या प्रवास करत होत्या. दरम्यान, चोरट्यांनी ट्रॅव्हल्समध्ये पाळत ठेवून त्यांच्या पिशवीतील 10 तोळे सोन्याचे दागिने चोरले होते. पुण्यात आल्यानंतर त्यांना बॅग अर्धीवट उघडी दिसल्याने चोरी झाल्याचा संशय आला. त्यांनी बॅगची तपासणी केली असता दागिने चोरल्याचे दिसून आले.
त्यांनी तात्काळ पोलिसांकडे तक्रार दिली. वानवडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करत तपास सुरू केला होता. वरिष्ठ निरीक्षक भाऊसाहेब पठारे यांनी तपास करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने पोलिसांनी सीसीटीव्हीची तपासणी केली. त्यात दोन संशयित दिसून आले. माहिती घेतली असता दोघे गंगाखेड येथे असल्याचे दिसून आले. त्यानूसार, पथकाने दोघांना गंगाखेड येथे जाऊन पकडले. त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी चोरी केल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून पावणे चार लाखांचे दागिने तसेच 6 मोबाईल देखील जप्त करण्यात आले आहेत. पुढील (Pune) तपास पोलीस करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
