सत्यपाल मलिक यांना सीबीआयकडून समन्स?
पुलावामा हल्ल्यासंदर्भात खळबळजनक दावा करणारे जम्मू-काश्मीर राज्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना सीबीआयने समन्स बजावले आहे. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असताना ३०० कोटी रुपयांची लाच दिल्याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. सत्यपाल मलिक एका हिंदी वृ्त्तवाहिनीशी बोलताना मलिक म्हणाले, "सीबीआयने मला हजर राहण्यास सांगितले आहे. भ्रष्टाचाराच्या या प्रकरणी त्यांना माझ्याकडून काही गोष्टींवर स्पष्टीकरण हवे आहे. त्यांनी मला 27 आणि 28 एप्रिल रोजी हजर राहण्यास तोंडी आदेश दिले आहेत." सत्यपाल सिंग यांनी ही माहिती दिली असली तरी, अद्यापपर्यंत सीबीआयकडून सत्यपाल मलिक यांच्या या दाव्याला दुजोरा दिलेला नाही.
काय प्रकरण आहे?
सत्यपाल मलिक यांना 2018 मध्ये जम्मू-काश्मीरचे राज्यपाल म्हणून पदभार दिले गेले होते. मलिक यांच्या कार्यकाळातच केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवले. यानंतर त्यांना मेघालय राज्यात राज्यपाल म्हणून पाठवण्यात आले. पण दरम्यान, 23 ऑगस्ट 2018 ते 30 ऑक्टोबर 2019 पर्यंत जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असताना, दोन फाईल्सला मंजुरी देण्यासाठी आपल्याला 300 कोटी रुपयांची लाच देऊ केल्याचा दावा, त्यांनी केला होता.काश्मीरचे राज्यपाल असताना दोन फाईल्स त्यांच्याकडे मंजुरीसाठी आल्याचे त्यांनी सांगितले होते. यातील एक फाइल अंबानींची होती आणि दुसरी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या संबंधित एका व्यक्तीची होती. ही व्यक्ती तत्कालीन मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील पीडीपी-भाजप युती सरकारमध्ये मंत्री होती. ही व्यक्ती पंतप्रधान यांच्याही खूप जवळची होती, असा खळबळजनक दावा मलिक यांनी केला होता.हा घोटाळा असल्याची माहिती मला दोन्ही विभागांच्या सचिवांनी दिली आणि त्यानुसार मी दोन्ही करार रद्द केले, असा दावा त्यांनी केला होता. प्रत्येक फाईल पास करण्यासाठी तुम्हाला 150 कोटी रुपये मिळतील, असे सचिवांनी सांगितले होते, असा ही गौप्यस्फोट त्यांनी केला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.