Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुलगा आमदार असतानाही आई विकते बांबूच्या टोपल्या

मुलगा आमदार असतानाही आई विकते बांबूच्या टोपल्या 



आमदार, खासदार म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर चित्र येतं ते बंगला, पैसा, सुरक्षा. पण आजही काही आमदार असे आहेत की त्यांचे कुटुंबीय अगदी सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे राहतात. मुलगा आमदार असूनही आई रस्त्यावर बसून बांबूच्या टोपल्या विकत आहे. आता हे तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही. मात्र, हे खरं आहे. गंगुबाई जोरगेवार या मंदिराबाहेर बसून टोपल्या विक्रीचा व्यवसाय करतात. त्या चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री आहेत.
गेल्या पन्नास वर्षांपासून गंगुबाई अर्थात अम्मा जोरगेवार या बांबूपासून बनवलेल्या टोपल्या विकण्याचं काम करतात. वयाच्या 80 व्या वर्षी देखील गंगुबाई जोरगेवार या आपल्या व्यवसायाशी एकनिष्ठ आहेत. त्यांचा मुलगा किशोर जोरगेवार हे सध्या आमदार आहेत. पण तरी देखील त्या टोपल्या विकण्याचं काम करतात.त्यांचा हा साधेपणा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मुलगा आमदार असतानाही गंगूबाई जोरगेवार यांची व्यावसायिक धडपड सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या की, कष्टाने समाधान मिळत असेल तर आनंदच आहे. त्यात काय लाजायचं?, अशी प्रतिक्रिया गंगुबाई जोरगेवार यांनी दिली.
दरम्यान, मुलगा आमदार आहे, सुखात घरी बसून राहायचे दिवस आहेत. मात्र, तरी देखील गंगूबाई या बांबू ताटवे, टोपल्या विकण्याचा पिढीजात व्यवसाय करत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधीचे कुटुंब कसे असावे, याचं जोरगेवार हे कुटुंब आदर्श उदाहरण

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.