Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्हापूरच्या प्राध्यापकावरील गुन्हा रद्द करण्यास नकार!

कोल्हापूरच्या प्राध्यापकावरील गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयचा नकार!


कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगलेमधील एका प्राध्यापकाने 14 ऑगस्टला पाकिस्तानला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने त्याच्या विरोधातील गुन्हा रद्द करण्यास नकार दिला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले पोलीस ठाण्यात प्राध्यापक जावेद अहमद याच्यावरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावेद हा मूळचा जम्मू काश्मीरचा आहे. तो कोल्हापुरातील एका खासगी शाळेत शिकवत होता. त्यावेळी त्याने 5 ऑगस्ट हा जम्मू काश्मीरसाठी काळा दिवस आहे असं स्टेटस ठेवला होता. तर 14 ऑगस्टला पाकिस्तानला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या विरोधात जावेद विरोधात हातकणंगले येथं गुन्हा नोंद केला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी जावेद याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र हा गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

जावेद याने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते की, दोन गटांत वैर निर्माण होईल किंवा द्वेषभावना निर्माण होईल, असा कोणताही संदेश आपण प्रसारित केला नाही. मी केवळ स्वत:चे मत व्हॉट्सअॅप स्टेटसवर मांडले आहे. याचिकादाराने 13 आणि 15 ऑगस्ट दरम्यान व्हॉट्सअॅपवर दोन स्टेटस ठेवले होते. त्यात त्याने म्हटले होते की, 5 ऑगस्ट जम्मू आणि काश्मीरसाठी काळा दिवस आहे. या मेसेजखाली त्याने लिहिले होते की, कलम 370 रद्द केल्याने आम्ही खूश नाही. तसेच 14 ऑगस्टला पाकिस्तानला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले पोलिसांनी 26 वर्षीय प्राध्यापक जावेद अहमद हजम यांच्यावर गुन्हा दाखल केला. अर्जदाराने जम्मू-काश्मीरचा विशेष राज्य म्हणून दर्जा काढण्याबाबतचा व्हॉटस अॅफवरील स्टेटस मेसेज गांभीर्य विचारात न घेता ठेवल्याचे निरीक्षण न्या. सुनील शुक्रे व न्या. मिलिंद साठ्ये यांच्या खंडपीठाने नोंदविले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.