जम्मू काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना! फूटब्रिज कोसळला..
जम्मू-काश्मीरमधील उधमपूर गावात बैसाखी उत्सवादरम्यान शुक्रवारी फूटब्रिज कोसळला. या अपघातात 9 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून 61 जण जखमी झाल्याची माहिती आहे.यापैकी २५ जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.तर 5 जखमींची प्रकृती खालावल्याने त्यांना जम्मूला रेफर करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार,जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमध्ये शुक्रवारी बैसाखी उत्सवादरम्यान एक फूटब्रिज कोसळला. ही घटना चेनानी ब्लॉकमधील बैन गावात घडली आहे.अपघातानंतर अर्ध्या तासात पुलाखाली दबलेल्या सर्वांना बाहेर काढण्यात आले.उधमपूरच्या डीएमने एएनआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे.
ओव्हरलोडमुळे कोसळला पूल
अपघातातील सर्व जखमी संगम मंदिरात वार्षिक बैसाखी उत्सवात सहभागी होण्यासाठी जात असताना त्यांच्यासोबत हा अपघात झाला.घटनेची माहिती मिळताच सर्वसामान्य नागरिक व पोलीस घटनास्थळी दाखल झाले.जखमींना उपचारासाठी चेनानी, उधमपूर आणि जम्मू येथील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, उधमपूरच्या बैन गावात बैसाखीच्या दिवशी जत्रेचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये लोक मोठ्या संख्येने सहभागी होतात. यावेळीही जत्रेत मोठी गर्दी झाली होती. यादरम्यान पुलावर जास्त लोक चढल्याने हा अपघात झाला. हा फूटब्रिज परिसरातील नागरिकांनी पैसे जमा करून बांधल्याचा दावा केला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
