Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सेक्स रॅकेट प्रकरणी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक!

सेक्स रॅकेट प्रकरणी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक!


मुंबई:  सेक्स रॅकेट प्रकरणी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री व कास्टिंग दिग्दर्शक आरती मित्तलला सोमवारी(१७ एप्रिल) पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई क्राइम ब्रांच युनिट ११ने ही कारवाई केली आहे. पोलीस अधिकारी मनोज सुतार यांना या सेक्स रॅकेटबद्दल माहिती मिळाली होती.

पोलिसांनी बनावट ग्राहकांना हॉटेलवर पाठवत हे प्रकरण उघडकीस आणलं. त्यांनी आरती मित्तलकडे दोन मुलींची मागणी केली. यासाठी ६० हजार रुपये आरतीने मागितले होते. त्यानंतर आरती मित्तलला दोन मुलींना घेऊन हॉटेलवर बोलविण्यात आलं होतं. यामध्ये सामील होण्यासाठी आरतीने अधिक पैशांची मागणीही केली होती. आरती हॉटेलवर येताच पोलिसांनी तिला अटक केली. आरती मित्तल सेक्स रॅकेट प्रकरणात दोन मॉडेल्सची गोरेगाव येथून सुटका करण्यात आली आहे. या मॉडेल्सला आरती मित्तल १५ हजार रुपये देणार होती, असा खुलासा त्यांनी केला आहे.

कोण आहे आरती मित्तल?

आरती मित्तल कास्टिंग दिग्दर्शक व अभिनेत्री आहे. ‘अपनापन’ या मालिकेत ती झळकली होती. काही दिवसांपूर्वीच आरतीने बॉलिवूड अभिनेता आर माधवनसह चित्रपटाचं शूटिंग करत असल्याची पोस्ट केली होती.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.